Income Tax Return : प्राप्तिकर विभागाला ही माहिती दिली नाही तर येईल नोटीस

करदात्याने रिटर्न भरताना कोणतीही चुकीची माहिती दिली असेल किंवा कोणतीही माहिती दडवली असेल, तर त्याला आयकर सूचनेला सामोरे जावे लागू शकते.
Income Tax Return
Income Tax Returngoogle

मुंबई : प्राप्तिकर विभागाने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर परतावा तपशील भरण्यासाठी आयटीआर फॉर्म जारी केला आहे. करदाते त्यांच्या श्रेणीनुसार वेगवेगळे फॉर्म वापरू शकतात.

प्राप्तिकर विभागाने रिटर्न भरणे सोपे करण्यासाठी या वर्षी आधी भरलेले फॉर्म प्रसिद्ध केले आहेत. यासोबतच फॉर्म 26ASशी जुळवण्यासही सांगितले आहे. याशिवाय, नोव्हेंबर २०२१पासून आणखी एक नवीन प्रणाली सुरू करण्यात आली आहे ती म्हणजे वार्षिक माहिती विधान (AIS).

या स्टेटमेंटमध्ये तुमच्या संपूर्ण वर्षाचा संपूर्ण आर्थिक हिशोब असतो. त्यामुळे जर करदात्याने रिटर्न भरताना कोणतीही चुकीची माहिती दिली असेल किंवा कोणतीही माहिती दडवली असेल, तर त्याला प्राप्तिकर सूचनेला सामोरे जावे लागू शकते.

Income Tax Return
Currency Notes : नोटांच्या कडेला छापलेल्या या तिरप्या रेषांचा अर्थ काय ?

यावर्षी रिटर्न प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी, प्राप्तिकर विभागाने करदात्यांना 9 तपशील नमूद करण्यास सांगितले आहे. याद्वारे विभागाला आर्थिक व्यवहारांशी संबंधित संपूर्ण माहिती मिळणार आहे. यामध्ये बचत खाती, गुंतवणूक आणि मालमत्ता खरेदी आणि विक्री यांसारख्या डेटाचा समावेश असेल.

Income Tax Return
Cyber fraud : WhatsAppवरील हे संदेश आहेत फसवे; होईल आर्थिक लूट

१. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीबाबत माहिती : या अंतर्गत तुम्हाला १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीची माहिती तारखेसह द्यावी लागेल. आयटीआर फॉर्ममधील कॅपिटल गेन्सच्या कॉलममध्ये याचा उल्लेख करावा लागेल.

२. घराच्या नूतनीकरणाची माहिती : जर तुम्ही गेल्या आर्थिक वर्षात तुमच्या घराचे नूतनीकरण केले असेल तर ही माहिती देखील ITR मध्ये द्यावी लागेल. त्याचा उपयोग भांडवली नफा कर मोजण्यासाठी केला जाईल.

३. पीएफ खात्याचे व्याज : जर तुमच्या पीएफ खात्यातील योगदान वार्षिक २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ते आयटीआरमध्ये उघड करावे लागेल. या रकमेवर मिळणारे व्याज कराच्या अधीन आहे.

४. मालमत्तेचे वास्तविक मूल्य : आतापर्यंत आयकर विभाग आयटीआर फॉर्ममध्ये भांडवली नफ्याच्या माहितीसाठी निर्देशांक खर्च विचारत असे, परंतु यावेळी मालमत्ता खरेदीची वास्तविक किंमत देखील नमूद करावी लागेल.

५. ESOP वर कर सूट : यावेळी ITR भरताना, स्टार्टअप कर्मचार्‍यांना त्यांच्या ESOP वर मिळालेल्या कर सूटबद्दल माहिती द्यावी लागेल. २०२२च्या बजेटमध्ये सरकारने स्टार्टअप कर्मचाऱ्यांना ही सूट दिली होती.

६. पेन्शनधारकांना त्यांची श्रेणी सांगावी लागेल : यावेळी आयटीआर फॉर्ममध्ये, पेन्शनधारकांना त्यांची श्रेणी देखील सांगावी लागेल. जर केंद्रीय कर्मचारी असेल तर सीजी आणि राज्याचा असेल तर एसजीची निवड करावी लागेल. सरकारी कंपनी असेल तर PSU ची निवड करावी लागेल.

७. परदेशात असलेली मालमत्ता आणि उत्पन्न, मालमत्ता विक्रीची माहिती : परदेशात असलेल्या तुमच्या मालमत्तेचा तपशील आणि तेथून मिळालेल्या उत्पन्नाचा तपशील मागितला जाईल. त्यात लाभांश आणि व्याजाच्या स्वरूपात मिळालेल्या कमाईचाही समावेश होतो. तसेच, जर तुम्ही परदेशातील कोणतीही मालमत्ता विकली असेल तर ही माहिती देखील ITR मध्ये द्यावी लागेल.

नोटीस आली तर काय करावे

कोणत्याही त्रुटीमुळे, तुम्हाला आयकर विभागाची नोटीस मिळाली, तर सर्वप्रथम उत्तर देण्यास उशीर न करण्याचा प्रयत्न करा आणि निर्धारित वेळेत उत्तर द्या. विभागाकडून मागितलेला कर भरला असेल, तर तुम्ही तुमची बाजू मांडू शकता, पण जर कर दायित्व वाजवी असेल, तर ते लवकर भरणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com