Income tax : 'अटल पेन्शन योजने'बाबत सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या नवा बदल

ऑक्टोबरपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे
Ministry of Finance
Ministry of FinanceSakal
Updated on

नवी दिल्ली : आयकर करदात्यांसाठी मोठी बातमी असून एक ऑक्टोबरपासून सरकारची सामाजिक सुरक्षा योजना अटल पेन्शन योजनाचा (APY) लाभ आता मिळणार नाही. केंद्र सरकारने याबाबत अधिकसुचना जाहीर केली आहे. सरकारने प्रामुख्यानं असंगठीत क्षेत्रातील श्रमिकांसाठी जून २०१५ पासून ही योजना आणली होती. (Income taxpayers wont be eligible to join Atal Pension Yojana from October)

Ministry of Finance
पालकमंत्र्यांची यादी जाहीर? ध्वजारोहणासाठी मंत्र्यावर जिल्ह्याची जबाबदारी

या योजनेंतर्गत अंशधारकांना त्यांच्या योगदानाच्या आधारावर ६० वर्षे वय झाल्यानंतर गॅरंटीसह १००० ते ५००० रुपयांची मासिक पेन्शन मिळते. पण आता या योजनेत केंद्राच्या अर्थ खात्यानं बदल केला आहे. हा बदल १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

काय झालाय बदल?

अर्थमंत्रालयानं आपल्या अधिसूचनेत म्हटलं की, एक ऑक्टोबर २०२२ पासून जो नागरिक आयकरदाता आहे. तो AYP योजनेसाठी पात्र नसेल. या योजनेबाबतच्या आपल्या मगील अधिसुचनेत केंद्रात बदल केला आहे. बुधवारी काढलेल्या नव्या अधिसूचनेनुसार ही योजना आता त्या अंशधारकांना लागू होणार नाही जे १ ऑक्टोबर २०२२ पूर्वीपासून या योजनेचा फायदा घेत आहेत.

ऑक्टोबरनंतर खातं होणार बंद

अधिसुचनेनुसार, जर एखादा अंशधारक जो १ ऑक्टोबर २०२२ ला किंवा त्यानंतर या योजनेत समाविष्ट होईल. तसेच जर आढळून आलं की हा करदाता अर्ज करण्याच्या तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी आयकरदाता होता. तर त्याचं AYP खातं बंद केलं जाईल. आत्तापर्यंतची त्याची शिल्लक पेन्शनची रक्कम त्याला परत दिली जाईल. आयकर कायद्यानुसार, अडीच लाख रुपयांपर्यंत करपात्र उत्पन्न असलेल्या लोकांना आयकर भरण्याची गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com