पालकमंत्र्यांची यादी जाहीर? ध्वजारोहणासाठी मंत्र्यावर जिल्ह्याची जबाबदारी

१९ जिल्ह्यांसाठी कोण कोणते मंत्री ध्वजारोहण करतील पाहा संपूर्ण यादी
cabinet minister
cabinet ministersakal
Updated on

मुंबई : विरोधकांच्या दबावानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला पण अद्याप खाते वाटप जाहीर झालेलं नाही. पण येत्या स्वांतत्र्यदिनासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी सरकारी ध्वजारोहण कार्यक्रम जाहीर झाला असून यासाठी मंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरुन आता ही यादी म्हणजेच पालकमंत्रीपदांची यादी असल्याची चर्चा सुरु आहे. (Minister gives responsibilty of flag hoisting for Iday ceremoney it may list of guardian ministers)

cabinet minister
उद्धव ठाकरेंना ECचा झटका! १५ दिवसांत बाजू मांडण्याचे निर्देश

१५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी १९ जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण कोण करणार? याची यादी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरात, सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरात, चंद्रकांत पाटील पुण्यात ध्वजारोहण करतील. त्यामुळं जे मंत्री ज्या जिल्ह्यात ध्वजारोहण करतील तेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १९ जिल्ह्यांव्यतिरिक्त जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी ध्वाजारोहण करणार आहेत.

cabinet minister
PM मोदींनी व्यंकय्या नायडूंची केली आचार्य विनोबा भावेंशी तुलना!

दरम्यान, कोणत्या जिल्ह्यांतील ध्वजारोहणाची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली आहे. याची यादी अशी...

१) नागपूर - देवेंद्र फडणवीस

२) पुणे - चंद्रकांत पाटील

३) चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार

४) अहमदनगर - राधाकृष्ण विखे-पाटील

५) नाशिक - गिरीश महाजन

६) धुळे - दादा भुसे

७) जळगाव - गुलाबराव पाटील

८) ठाणे - रविंद्र चव्हाण

९) मुंबई उपनगर - मंगलप्रभात लोढा

१०) सिंधुदुर्ग - दीपक केसरकर

११) रत्नागिरी - उदय सामंत

१२) परभणी- अतुल सावे

१३) औरंगाबाद - संदीपान भुमरे

१४) सांगली - सुरेश खाडे

१५) नंदुरबार - विजयकुमार गावित

१६) उस्मानाबाद - तानाजी सावंत

१७) सातारा - शंभुराज देसाई

१८) अब्दुल सत्तार - जालना

१९) यवतमाळ - संजय राठोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com