esakal | ‘एटीएम’साठीच्या ‘इंटरचेंज फी’मध्ये वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

ATM

‘एटीएम’साठीच्या ‘इंटरचेंज फी’मध्ये वाढ

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) आदेशामुळे आता विविध बँकांच्या ‘एटीएम’मधून (ATM) पैसे (Money) काढण्याच्या नियमांमध्ये एक ऑगस्टपासून बदल होत असून, त्याचा अप्रत्यक्ष परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. त्याचबरोबर नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस (एनएसीएच) (NACH) ही प्रणाली आता रविवारसह सर्व सुट्यांच्या दिवशीही चालू राहणार आहे. त्यामुळे पगार, पेन्शन, लाभांश, इएमआय, एसआयपी, विमा हप्ता आणि विविध प्रकारची बिले ही संबंधित दिवशी सुटी असली तरीही देय होणार आहेत. (Increase in Interchange Fee for ATM)

हेही वाचा: दररोज फक्त शंभर रुपये गुंतवा अन् व्हा कोट्यधीश

आजपासून होणारे आर्थिक बदल

  • रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर बँकांनी ‘एटीएम’साठीच्या इंटरचेंज फी मध्ये वाढ केली आहे. आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार हे शुल्क १५ वरून १७ रुपये करण्यात आले आहे, तर बिगर-आर्थिक व्यवहारांसाठी ५ वरून ६ रुपये करण्यात आले आहे.

  • रिझर्व्ह बँकेच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ग्राहकांना त्यांचे खाते असलेल्या बँकेच्या ‘एटीएम’मधून दरमहा पाच मोफत व्यवहार करता येतील. त्यानंतरच्या व्यवहारांवर शुल्क लागू होईल.

  • आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थळानुसार, बचत खात्यावरील विविध व्यवहारांसाठीच्या सेवाशुल्कात बदल करण्यात आला आहे. सुधारित सेवाशुल्क एक ऑगस्टपासून लागू होणार आहे. यात होम ब्रँच आणि नॉन-होम ब्रँच मधील रोख भरणा; तसेच धनादेश पुस्तिकेसाठीच्या शुल्काचा समावेश आहे.

  • नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस (एनएसीएच) ही प्रणाली आता रविवारसह सर्व सुट्यांच्या दिवशीही कार्यरत राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या खात्यातील शिलकी रकमेवर बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे. स्थायी सूचना (स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स) दिलेली दूरध्वनी, वीज बिले, कर्ज हप्ते, म्युच्युअल फंडांची एसआयपी, विम्याचे हप्ते आदींसाठीची रक्कम निर्धारित दिवशी सुटी आली तरी देखील खात्यातून वळती होणार आहे.

  • पगार, पेन्शन यासारखी रक्कम देखील संबंधित बँकेला सुटी आली तरी निर्धारित दिवशीच खात्यात जमा होऊ शकणार आहे.

  • इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेने देखील (आयपीपीबी) घरपोच बँकिंग व अन्य काही सेवांवरील शुल्कात एक ऑगस्टपासून बदल करण्याचे ठरविले आहे. पूर्वी मोफत असणारी घरपोच बँकिंग सेवा आता २० रुपये अधिक जीएसटी असे शुल्क भरून मिळू शकेल.

loading image
go to top