esakal | केंद्राच्या तिजोरीत सप्टेंबरमध्ये GST चे १ लाख कोटी रुपये जमा
sakal

बोलून बातमी शोधा

nirmala-sitharaman

केंद्र सरकारला सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटीमधून मोठा महसूल मिळाला आहे.

सलग तिसऱ्या महिन्यात GST उत्पन्न १ लाख कोटींहून जास्त

sakal_logo
By
टीम ई सकाळ

केंद्र सरकारला सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटीमधून मोठा महसूल मिळाला आहे. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यातील जीएसटी महसूल हा १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी जीएसटी महसूलाची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार सप्टेंबरमध्ये देशात १ लाख १७ हजार १० कोटी रुपये जीएसटी मिळाले. याआधी ऑगस्टमध्ये हाच महसूल १ लाख १२ हजार कोटी इतका होता.

सप्टेंबर महिन्यात सीजीएसटीच्या माध्यमातून २० हजार ५७८ कोटी रुपये जमा झाले आहेत. तर एसजीएसटीमध्ये २६ हजार ७६७ कोटी रुपये जमा झाले. याशिवाय आयजीएसटीचे कलेक्शन ६० हजार ९११ कोटी रुपये इतके आहे. यात २९ हजार ५५५ कोटी रुपये हे फक्त गुड्स इम्पोर्टमधील आहेत. सेसच्या माध्यमातूनही केंद्राला ८ हजार ७५४ कोटी रुपये मिळाले आहेत.

हेही वाचा: ऑक्टोबरमध्ये गॅस दराचा भडका; जाणून घ्या किंमत

जुलै महिन्यात जीएसटी कलेक्शन हे १.१६ लाख कोटी रुपये इतकं होतं. गेल्या वर्षी याच महिन्यात ८७ हजार ४२२ कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता. तर जून २०२१ मध्ये जीएसटी कलेक्शन ९२ हजार ८४९ रुपये इतकं होतं.

loading image
go to top