देशाकडे पुरेसे परकी चलन - अरुण जेटली 

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली - रुपयातील अवमूल्यन रोखण्यासाठी सरकारकडे पुरेसा परकी चलनसाठा असल्याचे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. मंगळवारी (ता. १४) रुपयाने ७०.०९ चा ऐतिहासिक नीचांक गाठला होता. त्या पार्श्‍वभूमीवर जेटली यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

तुर्कस्तानमधील चलन संकटाचे पडसाद आशियातील चलनांवर उमटले आहेत. दोन सत्रांत चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठे अवमूल्यन झाले. रुपयाने ७०.०९ ची नीचांकी पातळी गाठली. त्यानंतर तुर्की चलन लिरा सावरल्यानंतर आणि रिझर्व्ह बॅंकेने चलन बाजारात हस्तक्षेप केल्यामुळे रुपयातील पडझड थांबली. दिवसअखेर रुपया नीचांकातून सावरला. 

चलन बाजारातील संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारकडे पुरेशा प्रमाणात परकी चलनसाठा असल्याचे जेटली यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

रुपयावर  टांगती तलवार 
जागतिक चलन बाजारातील घडामोडींचे पडसाद रुपयावर उमटणार आहेत. तुर्कस्थानचे लिरा चलन आणि रशियन रुबेलची कामगिरी उदयोन्मुख अर्थव्यवस्थांवर परिणामकारक ठरेल. युरोपातील बड्या बॅंकांनी तुर्कस्थानला कर्ज दिले आहे. त्यामुळे तुर्कस्थानमधील आर्थिक संकटाने या बॅंकांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे, असे मत एडलवाईज सिक्‍युरिटीजच्या परकी चलन विभागाचे प्रमुख सजल गुप्ता यांनी व्यक्‍त केले. ऑक्‍टोबरपर्यंत तो ७० च्या खाली जाईल, असे गुप्ता यांनी सांगितले. 

अर्थव्यवस्था मजबूत!
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम चलन बाजारावर झाला आहे. या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे, असे जेटली यांनी सांगितले. तुर्कस्तानमधील संकटाने उदयोन्मुख बाजारपेठांवरील जोखीम वाढवली आहे. डॉलर मजबूत होत आहे. त्यामुळे उदयोन्मुख अर्थव्यवस्थांची चलने डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत अससल्याचे जेटली यांनी म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India has enough foreign currency says Arun Jaitley