मोदी सरकार लवकरच काळा पैसा आणणार भारतात

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जुलै 2019

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळा पैसा परत आणण्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. स्विस बँकेतील भारतीय खातेधारकांची माहिती लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या ऑटोमॅटिक इक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन (एईओआय) करारानुसार लवकरच स्विस बँकेतील खातेधारकांची माहिती 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार आहे. जुलै 2018 मध्ये झालेल्या याच करारानुसार स्विस बँकेतील भारतीय खातेधारकांची माहिती उपलब्ध होणार आहे. 

स्विस बँकेतील खातेधारकांची माहिती सोपवण्यापूर्वी स्विस सरकारला संसदीय प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मात्र भारतीयांच्या खात्यांच्या बाबतीत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने भारत सरकारला 30 सप्टेंबरपर्यंत माहिती मिळणार आहे. माहिती देवाणघेवाणीमुळे भारत आणि स्वित्झर्लंड सरकारमधील संबंध एका नव्या उंचीवर जाऊन पोचतील, असे स्विस अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले. स्विस सरकारकडून खातेधारकांची माहिती मिळणार असल्याच्या वृत्ताला दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील दुजोरा दिला.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती कर कार्यालयाने भारतीय खातेधारकांची संख्या जास्त असल्याने माहिती देण्यास विलंब होणार आहे. स्वित्झर्लंडच्या अर्थ मंत्रालयाने आणि मध्यवर्ती कर कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतासह एकूण ७३ देशांना स्विस बँकेतील खातेधारकांची माहिती देण्यात येणार आहे. या सर्व देशांसोबत स्वित्झर्लंड सरकारने ऑटोमॅटिक इक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन करार केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India likely to get information on 50 Swiss bank account holders