मोदींचा तोहफा; पेट्रोल होणार 10 रुपये स्वस्त?

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नवी दिल्ली: मोदी सरकार लवकरच मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. देशभरात पेट्रोल दहा रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण सरकार 15 टक्के मिथेनॉल मिश्रीत पेट्रोल आणण्याची तयारी करत आहे. काही वाहनांमध्ये मिथेनॉल मिश्रित पेट्रोल टाकून प्रयोग देखील सुरु झाले आहेत. नीती आयोगाने देखील मिथेनॉल मिश्रित पेट्रोलवर वाहने चालवण्यासाठी यासाठी आग्रह धरला आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात पेट्रोल दहा रुपयांनी स्वस्त होण्याची आशा निर्माण झाली आहे. सध्या पेट्रोल-डिझेलमध्ये इथेनॉल टाकले जाते. मात्र  इथेनॉलच्या उत्पादनात मिथेनॉलच्या तुलनेत अधिक खर्च होतो. 

- जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर सतत वाढत असल्याने देशातील  पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होते. परिणामी आता सरकार मिथेनॉल मिश्रीत पेट्रोल आणण्याची जोरदार तयारी करत आहे. 
-पुण्यात वाहनांमध्ये मिथेनॉल मिश्रित पेट्रोल टाकून प्रयोग सुरु झाले आहेत. 
- मिथेनॉल मिश्रित पेट्रोल 8 ते 10 रुपयांनी स्वस्तात मिळू शकते. 
- पुण्यात मारुती आणि हुंदाईच्या वाहनांमध्ये प्रयोग सुरु. 
-येत्या दोन ते तीन महिन्यात प्रयोगाचे निष्कर्ष येण्याची शक्यता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India is ready for 15 per cent blending of methanol with petrol