इंडियाबुल्स हौसिंग फायनान्समध्ये एक लाख कोटींचा गैरव्यवहार? 

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

"इंडिया बुल्स"च्या शेअरमध्ये घसरण 
मुंबई: गृहकर्ज व्यवसायातील बिगर बॅंकिंग वित्त संस्था (एनबीएफसी) असलेल्या इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स या कंपनीमध्ये सुमारे एक लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्यानंतर कॉर्पोरेट जगतात खळबळ उडाली आहे. या आरोपाचे पडसाद "इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स"च्या शेअरवर उमटले. सोमवारी (ता.29) भांडवली बाजारात "इंडियाबुल्स"चा शेअर सात टक्‍क्‍यांपर्यंत घसरला. 

स्वामी यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स आणि त्यातील कंपन्या या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचे म्हटले आहे. इंडियाबुल्स हौसिंग फायनान्सने शेकडो बनावट कंपन्या तयार करून त्याद्वारे नॅशनल हौसिंग बॅंकेतून कर्ज घेतले आहे. हा निधी कंपनीने महाराष्ट्र, दिल्ली, गुडगांव, बंगळुरू, चेन्नई या शहरांमधील बांधकाम प्रकल्पांमध्ये बेकायदेशीर गुंतवण्यात आले असल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे. ही गुंतवणूक 30 कोटी ते एक हजार कोटींच्या दरम्यान आहे. हीच रक्कम पुन्हा गुंतवणूक म्हणून इंडियाबुल्सने स्वीकारली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्‍यता स्वामी यांनी व्यक्त केली आहे. स्थावर मालमत्ता, बॅंक आणि भांडवली बाजार असे मिळून इंडियाबुल्सने जवळपास एक लाख कोटींचा घोटाळा केला असल्याचे आरोप स्वामी यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक आणि विशेष लेखा परिक्षण करण्याची मागणी स्वामी यांनी केली आहे. 
 
इंडियाबुल्सने आरोप फेटाळले 
दरम्यान, स्वामींचे घोटाळ्याचे आरोप कंपनीने फेटाळून लावले आहेत. "इंडियाबुल्स"ने नॅशनल हौसिंग बॅंकेचे थकवलेले नाही, अशी माहिती शेअर बाजाराला दिली आहे. त्याचबरोबर कोणत्याही बनावट कंपन्यांद्वारे कर्ज घेतेलेले नाही, असा दावा इंडियाबुल्स हौसिंग फायनान्सकडून करण्यात आला आहे.इंडियाबुल्सने आजपर्यंत नॅशनल हौसिंग बॅंककडून कर्जाची सुविधा घेतलेले नाही, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीकडे 87 हजार कोटींची कर्ज आहेत. मात्र त्यात इंडियाबुल्सचे कर्ज थकलेले नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indiabulls Housing Finance drops 10% on Swamy's fraud allegation