गुंतवणुकीची संधी: इंडियामार्टचा आयपीओ 24 जूनपासून खुला !

वृत्तसंस्था
Wednesday, 19 June 2019

मुंबई: इंडियामार्ट इंटरमेश लि. या कंपनीचा आयपीओ 24 जूनपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. इंडियामार्टडॉटकॉम ही वेबसाईट या कंपनीकडून चालवली जाते. इंडियामार्ट हे देशातील लघु आणि मध्यम व्यवसायासाठीचे आघाडीचे ऑनलाईन व्यासपीठ आहे. कंपनीच्या 24 जूनला येणाऱ्या आयपीओसंदर्भातील माहिती आज इंडियामार्टकडून देण्यात आली.

 कंपनीने शेअरचा किंमतपट्टा 970-973 रुपये प्रति शेअर यादरम्यान ठेवला आहे. इंडियामार्टचा आयपीओची अंतिम मुदत 26 जून आहे. या आयपीओच्या माध्यमातून इंडियामार्ट आणि तिचे सध्याचे गुंतवणूकदार एकूण 40 लाख 88 हजार शेअर बाजारात आणणार आहेत. आयपीओच्या माध्यमातून कंपनीचा 475.5 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचा मानस आहे. इंडियामार्टमधील सध्याचे गुंतवणूकदार असलेले इंटेल कॅपिटल, अॅमाडस कॅपिटल पार्टनर्स आणि कोना कॅपिटल या आयपीओतून आपल्या शेअरची विक्री करणार आहेत. इंटेल कॅपिटल 252 कोटी रुपयांच्या मुल्याचे शेअर बाजारात उपलब्ध करून देणार आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटिज, एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस आणि जेफरिज या कंपन्या इंडियामार्टच्या आयपीओचे व्यवस्थापन करणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IndiaMart's ₹475 crore IPO opens on 24 June