esakal | भारताच्या अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन'साठी 2021-22 ची वाट बघावी लागणार - एडीबी
sakal

बोलून बातमी शोधा

modi parliament

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारताने लॉकडाऊन केला. या लॉकडाऊनचे गंभीर परिणाम झाले आहेत. भारताच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नात मोठी घसरण होईल असा अंदाज एडीबीने वर्तवला होता तो खरा ठरला आहे. 

भारताच्या अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन'साठी 2021-22 ची वाट बघावी लागणार - एडीबी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोनामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. एकीकडे जीडीपी उणे 23.9 पर्यंत खाली गेला आहे. असे असताना आता एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अहवालातून आणखी एक धक्का बसला आहे. भारताची अर्थव्यवस्था यंदा 9 टक्क्यांनी घसरणार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. एडीबीच्या अहवालानुसार कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी बाजार पेठांमधील मागणीही कमी झाली असून उद्योग व्यवसायांना घरघर लागल्याचं दिसत आहे. एडीबीने भारताच्या अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था पुढच्या वर्षीपर्यंत कायम राहणार असल्याचं म्हटल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. 

भारताच्या अर्थव्यवस्थेचा दर 2021-22 या वर्षात 8 टक्क्यांपर्यंत राहील असं एडीबीने म्हटलं आहे. कोरोनामुळे बाजारपेठांमधील उलाढाल जवळपास ठप्पच आहे. पुढच्या वर्षी मागणी पुन्हा सुरु झाल्यानंतर सर्व पुर्वपदावर येईल आणि बाजारपेठांची आर्थिक स्थिती सुधारेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. याचाच अर्थ भारताच्या अर्थव्यवस्थेला पुढच्या आर्थिक वर्षातच अच्छे दिन बघायला मिळतील असं या अहवालावरून दिसतं. 

आगामी आर्थिक वर्षात व्यापाराबाबत देवाण - घेवाण वाढेल असं एडीबीने अहवालात सांगितलं आहे. व्यवहारांमध्ये वाढ झाल्यास आर्थिक विकासाचा दर वाढेल असंही म्हटंल आहे. एडीबीचे प्रमुख अर्थतज्ज्ञ यासुयुकी सवादा म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारताने लॉकडाऊन केला. या लॉकडाऊनचे गंभीर परिणाम झाले आहेत. भारताच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नात मोठी घसरण होईल असा अंदाज एडीबीने वर्तवला होता तो खरा ठरला आहे.

हे वाचा - फ्लिपकार्टमध्ये मेगा भरती; 70 हजार लोकांना उपलब्ध होणार रोजगार

कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यात चाचण्या वाढवणं, ट्रॅकिंग, आरोग्य सेवा पुरवणं याचा समावेश आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करताना अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काही गोष्टी करण्याची गरज आहे असं यासुयुकी सवादा यांनी म्हटलं आहे.