सागरी क्षेत्रात आहेत नोकरीच्या लाखो संधी 

सागरी क्षेत्रात आहेत नोकरीच्या लाखो संधी 

करिअर: जगातील एक तृतीयांश भाग हा पाण्याने व्यापलेला आहे .मात्र अजूनही प्रवासासाठी समुद्री मार्गांचा वापर केला जात नसला तरी पण व्यापारासाठी सर्वाधिक समुद्री मार्गाचाच वापर केला जातो. जागतिक पातळीवर सुमारे 80 टक्के माल वाहतूक समुद्री मार्गानेच होते. भारतातही बंदरांच्या विकासावर नवीन सरकारकडून मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येतो आहे. सुमारे 150 हुन अधिक प्रकल्पांवर काम सुरू असून येत्या दोन वर्षात 5 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मरीन इंजिनिअरिंग (सागरी अभियांत्रिकी) करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र विद्यार्थ्यांकडून दुर्लक्षित आहे. मात्र यात नोकरीच्या अमाप संधी आहेत. 

भारतात याविषयी काही शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. 

टी.एस चाणक्य; नवी मुंबई
टी.एस चाणक्यमध्ये बारावी (विज्ञान) नंतर तीन वर्षांचा नौशास्त्र पदवीचा कोर्स चालविला जातो. पदवी घेतल्यानंतर एक वर्षाचे समुद्री प्रशिक्षण घ्यावे लागते. या शासकीय संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी आयआयटी जेईईई परीक्षा देणे अनिवार्य आहे. या संस्थेमध्ये निवासी कोर्स असून सर्व मिळून वर्षाला ऐंशी हजारांचा खर्च येतो. 

मेरी (कोलकाता)
या शासकीय संस्थेत चार वर्षाचा नेव्हल इंजिनियरिंगचा कोर्स आहे. यासाठी देखील वर्षाला ऐंशी हजारांचा खर्च आहे. या संस्थेतील प्रवेश देखील आयआयटी जेईईईच्या माध्यमातून होतो. 

मेरी (मुंबई)
मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी मिळविलेल्या अभियंत्यांना मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेशासाठी या संस्थेत एक वर्षांचा कोर्स करता येतो. या कोर्सच्या प्रवेशा साठीची जाहिरात साधारण नोव्हेंबर महिन्यात येत असते. प्रवेश पूर्णपणे गुंणवत्तेवर मिळतो. यासाठी वर्षाला साधारण एक लाख रुपयांचा खर्च येतो. 

पदवीसह तंदुरुस्तीही आवश्यक 
मरीन इंजिनिअर होण्यासाठी मरीन या नॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई वा बीटेक पदवी गरजेची आहे. फिजिक्स, केमिस्ट्री गणितासह बारावी उत्तीर्ण होणारे या मरीन इंजिनिअरिंगच्या बीई वा बीटेक कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. बीई वा बीटेक कोर्समध्ये प्रवेश जेईईच्या गुणाच्या आधारावर मिळतो. काही संस्था स्वत:च्या प्रवेश परीक्षाही घेतात. मरीन इंजिनिअरसाठी शारीरिक तंदुरुस्ती उत्तम हवी. मास्टर डिग्रीत प्रवेशासाठी संबंधित शाखेत बीई वा बीटेक वा एमएस्सीची पदवी आणि गेट परीक्षा स्कोअर आवश्यक असतो. तथापि, हा कोर्स करवणाऱ्या संस्था देशात जास्त नाहीत.

वाढत्या बंदर क्षेत्रात नवी जहाजे व त्यांची देखभाल करणारे व्यावसायिकांची मागणी वाढणार आहे. बंदरे क्षेत्राच्या वेगवान विकासाच्या कारणाने मरीन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या काळात उत्तम संधी असू शकतात. मरीन इंजिनिअरिंगमध्ये नॉटिकल आर्किटेक्चर आणि विज्ञानाचाही समावेश आसतो. मरीन इंजिनिअरिंग कोर्समध्ये जहाजे व समुद्री नौकांना बनविणे आणि त्याची दुरुस्ती देखभाल करणे शिकविले जाते. जहाजाच्या देखभालीची जबाबदारी मरीन इंजिनिअरची असते. ते जहाज बनविण्यासाठी आवश्यक यंत्रांच्या निवडीसाठी जबाबदार असतात. ज्यात स्टीम ट्रिब्यून, गॅस टर्बाइन, कंट्रोल सिस्टिमचा समावेश होतो. 

इंडियन नेव्हीमध्ये नोकरी संधी: 
इंडियन नेव्हीने joinindiannavy.gov.in  या अधिकृत वेबसाइटवर अभियंत्यांची नोकरीची संधी असल्याची जाहिरात दिली आहे. 7 जूनपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. इंडियन नेव्हीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर म्हणून रुजू होण्याची संधी आहे. 

अर्ज करण्याची अंतिम तारीखः
उमेदवार 27 जून 2019 पर्यंत या पदांसाठी आपला अर्ज सादर करू शकतात.

कोण अप्लाय करू शकेल

ज्या उमेदवारांनी बीई /बी टेकचे अंतिम वर्ष पूर्ण केले आहे किंवा संगणकीय विज्ञान अभियांत्रिकी / संगणकीय अभियांत्रिकी कार्यालयातील इंजिनीयरिंगचा डिग्री अभ्यासक्रम तसेच मॅकेनिकल इंजिनियरिंग / मरीन इंजिनियरिंग / इंस्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग / एरोनॉटिकल इंजिनियरिंग / अभियांत्रिकीमध्ये एरोस्पेस अभियांत्रिकी शाखा, आणि इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग/  कम्युनिकेशनमध्ये इंजीनियरिंग / पॉवर इंजिनियरिंगचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केले आहे असे उमेदवार अर्ज करू शकणार आहे. 

वयाची अट:
उमेदवाराचा जन्म 2 जुलै 1996 ते 1 जुलै 1999 दरम्यान असणे आवश्यक आहे. 

पॅकेजदेखील आहे चांगले 
सब-लेफ्टनंट (लेव्हल 10) साठी निवडलेल्या उमेदवारांना 56,100 आणि 1,10,700 रुपयांदरम्यान वेतन मिळेल तर लेफ्टनंट (लेव्हल 10 बी) साठी वेतन 61,300 ते 1,20,900 रुपये असेल. तसेच लेफ्टनंट कमांडर (लेव्हल 11) यांना 64,400 आणि 1,36,900 रुपये आणि  कमांडर (लेव्हल 12 ए) 1,22,200  ते 2,12,400 रुपये मिळविण्यास पात्र असतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com