‘या’ सरकारी योजनेत गुंतवणुक केल्यास मिळू शकतात दुप्पट रिटर्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian post

‘या’ सरकारी योजनेत गुंतवणुक केल्यास मिळू शकतात दुप्पट रिटर्न

भारतीय पोस्ट खात्याद्वारे किसान विकास पत्र योजना ही बचत गुंतवणुकीची योजना चालवली जाते. सरकारने या तिमाहीत व्याजदरामध्ये वाढ केली आहे. या योजनेत गुंतवणुक केल्यास १२३ महिन्यांमध्ये म्हणजे १० वर्ष आणि ३ महिन्यांमध्ये तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात. विकास किसान पत्र योजना ही पोस्ट खात्यातील इतर बचत योजनांपैकी एक बचत योजना आहे.

किसान विकास पत्र योजनेअंतर्गत, कोणतीही प्रौढ व्यक्ती, ज्याचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे. ती व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये आपले खाते उघडू शकते. अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने त्याचे पालक खाते उघडू शकतात. या योजनेत वैयक्तिक (Personal) किंवा दोन व्यक्तींचे संयुक्त (Joint Account) खाते उघडता येते. संयुक्त खात्यात (Joint Account) जास्तीत जास्त तीन प्रौढ व्यक्तींचा समावेश होऊ शकतो.

हेही वाचा: Bank job : एसबीआयमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी; दीड हजार जागांवर भरती

गुंतवणुकीची रक्कम

या योजनेत गुंतवणुकीची कमीत कमी रक्कम १,००० रुपये आहे. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. ५०,००० हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुक करायची असल्यास पॅन कार्ड असणे अनिवार्य आहे.

गुंतवणुकीवर मिळणारे व्याज

सरकारने यावर्षी १ ऑक्टोबर रोजी या योजनेवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक ७% टक्के दराने व्याज मिळेल. यापूर्वी हा व्याजदर वार्षिक ६.९ टक्के होता. त्याचे व्याजदर सरकार वेळोवेळी बदलत असते.

हेही वाचा: Muhurat Trading : आज 'हे' पाच स्टॉक खरेदी केल्यास मिळू शकतात दुप्पट रिटर्न

गुंतवणूक कालावधी

तुम्ही तुमच्या सोयीनुसार किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करू शकता, म्हणजेच सरकारने ठरवून दिलेल्या वेळेच्या मर्यादेत गुंतवणूक करता येते. पण जर तुम्हाला तुमची रक्कम दुप्पट करायची असेल, तर तुम्हाला तुमची रक्कम १२३ महिन्यांसाठी म्हणजेच १० वर्षे आणि ३ महिन्यांसाठी गुंतवावी लागेल.