शेअरबाजारात सुधारणा; सेन्सेक्स 198 अंश वाढला | Indian Share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

शेअरबाजारात सुधारणा; सेन्सेक्स 198 अंश वाढला

मुंबई : गेले चार दिवस घसरण दाखवीत असलेल्या भारतीय शेअर बाजार (Indian share market) निर्देशांकांनी (co-ordinates) आज उसळी मारली. आज सेन्सेक्स (Sensex) 198.44 अंश तर निफ्टी (Nifty) 86.80 अंश वाढला. कालच्या सेन्सेक्सच्या 1,170 अंशांच्या घसरणीनंतर आज सकाळीही निर्देशांक घट दाखवीतच उघडले होते. पण नंतर ते हळुहळू सावरले व दिवसअखेर सेन्सेक्स 58,664.33 अंश तर निफ्टी 17,503.35 अंशांवर बंद झाला. आज धातूनिर्मिती कंपन्यांचे शेअर वाढले (Metal production company) तर वाहनउद्योगांच्या शेअरचे भाव घसरले.

हेही वाचा: डोंबिवली : 1 किलो 171 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त; एकाला अटक

अमेरिकेत काल मंदीचे वातावरण होते, तेथील आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. तर अमेरिकेतील कच्च्या तेलाचा राखीव साठा (स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह) खुला करण्याच्या निर्णयामुळे तेथील तेल कंपन्यांचे शेअर देखील दडपणाखाली होते. त्यामुळे भारतीय शेअर बाजारांना आज मोठी उसळी मारता आली नाही.

आज टाटास्टील ( बंदभाव 1,192 रु.), एअरटेल (759), सनफार्मा (783), बजाज फिनसर्व्ह (17,360), टेक महिंद्र (1,561), स्टेटबँक (493), लार्सन अँड टुब्रो (1,888), कोटक बँक (1,983), रिलायन्स इंडस्ट्रीज (2,386), टीसीएस (3,463) यांचे भाव वाढले. तर इंडसइंड बँक (980), एशियन पेंट (3,186), इन्फोसिस (1,732), बजाज ऑटो, मारुती, महिंद्र आणि महिंद्र या शेअरचे भाव कमी झाले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 47,990 रु.

चांदी - 64,000 रु.

loading image
go to top