Share Market update : सेन्सेक्स 454 अंश वाढला | Reliance | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market update : सेन्सेक्स 454 अंश वाढला

sakal_logo
By
- कृष्ण जोशी

मुंबई : भारतीय शेअरबाजार (Indian share market) निर्देशांकांचा (co-ordinates) तेजीमंदीचा सीसॉचा खेळ आजही सुरु राहिला. कालच्या पडझडीनंतर आज फक्त रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजच्या शेअरमुळे सेन्सेक्स (Sensex) 454.10 अंश तर निफ्टी (Nifty) 121.20 अंश वाढला.

हेही वाचा: शहापुरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आज दिवसअखेरीस सेन्सेक्स 58,795.09 अंशांवर तर निफ्टी 17,536.25 अंशांवर स्थिरावला. आज फक्त रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमुळेच निर्देशांकांना ही मजल मारता आली. रिलायन्स आज सहा टक्क्यांहूनही जास्त म्हणजे तब्बल 143 रुपये वाढून 2,494 रुपयांवर बंद झाला. निफ्टी व सेन्सेक्समधील रिलायन्सचा वाटा 12 ते पंधरा टक्के असल्याने रिलायन्सच्या भावातील वध-घटीचा परिणाम निर्देशांकांवरही होतो.

त्याचमुळे आज सेन्सेक्सही वधारला. आज एनएसई वर रिलायन्सच्या एक कोटी 95 लाख 68 हजार 487 शेअरचे व्यवहार झाले. गुंतवणुकदारांनी त्यापैकी 47 टक्के म्हणजे 92 लाख 45 हजार शेअर दिवसअखेर आपल्या डिमॅट खात्यात जमा करण्यासाठी (डिलीव्हरी ट्रेड) खरेदी केले.

आज रिलायन्सखेरीज इन्फोसीस (बंद भाव 1,722 रु), टेक महिंद्र (1,558), कोटक बँक (2,035), टायटन (2,397), भारती एअरटेल, सनफार्मा, नेस्ले, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस यांचे भाव वाढले. तर इंडसइंड बँक (959 रु), मारुती (7,569), आयसीआयसीआय, हिंदुस्थान युनिलीव्हर, अॅक्सीस बँक, बजाज ऑटो, लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटास्टील, डॉ. रेड्डीज लॅब, एचडीएफसी, महिंद्र आणि महिंद्र यांचे भाव कमी झाले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 47,481 रु.

चांदी - 62,900 रु.

loading image
go to top