शहापुरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या | Shahapur news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

शहापुरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

शहापूर : शेतातील झाडाला साडीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या (suicide case) केल्याची घटना शहापूर (Shahapur) तालुक्यातील कळमगाव येथे घडली. अक्षय भेरे (२५) (Akshay bhere) असे या तरुणाचे नाव असून, याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात (shahapur police station) आकस्मिक मृत्यूची (Accidental death) नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: शहापूर : ग्रामसेवकाला लाच घेताना अटक

कळमगाव येथे राहणारा अक्षय हा मंगळवारी (ता. २३) दुपारी जेवण करून बाहेर गेला, तो परतलाच नाही. त्याचा मोठा भाऊ भूषण व नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. बुधवारी (ता. २४) सकाळी त्याचा पुन्हा शोध सुरू केला असता अक्षय शेतातील एका मोहाच्या झाडाला साडीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याप्रकरणी शहापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top