शेअर बाजारात ब्लॅक मंडे; सेन्सेक्स 1170 अंश कोलमडला | Indian Share market update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sensex share market

शेअर बाजारात ब्लॅक मंडे; सेन्सेक्स 1170 अंश कोलमडला

मुंबई : गेले अनेक दिवस तेजीचे वारू कानात भरलेले भारतीय शेअर बाजार (Indian share market) निर्देशांक आज विविध कारणांमुळे सुमारे दोन टक्के कोलमडले. रिलायन्स (reliance) व आरामकोचा व्यवहार रद्द होणे, पेटीएमच्या (Paytm share collapse) शेअरची घसरण, चिनी अर्थव्यवस्थेतील (china economy) नकारात्मक बातम्या यामुळे आज सेन्सेक्स (Sensex) 1170.12 अंश निफ्टी 348.25 घसरला. गेल्या सात महिन्यांमधील ही सर्वात मोठी घसरण आहे. गेल्या चार सत्रांमध्ये निर्देशांक (Coordinates) सतत घसरत आहेत. आज दिवसअखेरीस सेन्सेक्स (Sensex) 58,465.89 अंशांवर व निफ्टी (Nifty) 17,416.55 अंशांवर बंद झाला.

हेही वाचा: ओळखपत्र नसणाऱ्या 75 हजार नागरिकांचे लसीकरण; BMC च्या मोहीमेला यश

आज सकाळपासूनच भारतीय शेअर बाजार निर्देशांक तोटा दाखविताच उघडले. त्यानंतर दिवसभरात ही घसरण आणखीनच वाढत गेली. सेन्सेक्स व निफ्टी हे दोघेही सुमारे दोन टक्के पडले. ही घसरण एवढी सर्वदूर होती की सेन्सेक्सच्या प्रमुख 30 समभागांपैकी फक्त तीन समभाग वाढत दाखवित बंद झाले. तर निफ्टीच्या प्रमुख 50 समभागांपैकी 41 समभाग तोट्यात बंद झाले.रिलायन्स व सौदी अरेबिया ची तेल कंपनी आरामको यांच्यातील बहुचर्चित व्यवहार रद्द झाल्याने गुंतवणूकदारांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची तुफान विक्री केली.

रिलायन्सचा शेअर सुमारे साडेचार टक्के घसरला. भारतातील तीन कृषी कायदे रद्द झाल्यानेही या निराशेत भर पडली. त्याखेरीज पेटीएम चा आयपीएलला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. तरी त्याचे लिस्टिंग झाल्यावर तो सातत्याने घसरत चालल्यानेही गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला. त्यातच चीनमधील किरकोळ विक्रीचे आकडे निराशाजनक असल्यानेही गुंतवणूकदारांच्या घबराटीत भर पडली. या सर्व कारणांमुळे आज भारतीय शेअर बाजारांनी नफा वसुली अनुभवली.

इतक्या दिवसात तुफानी वाढलेले बजाज फिन्सर्व्ह ( बंद भाव 17,073 रु. ) आणि बजाज फायनान्स (7,061) आज अनुक्रमे 839 व 429 रुपयांनी घसरले. त्याखालोखाल रिलायन्स इंडस्ट्रीज 109 रुपयांनी घसरून 2,363 रुपयांवर बंद झाला. मारुतीचा शेअर 248 रुपयांनी घसरून 7,864 रुपयांवर बंद झाला. बजाज ऑटो (3,444), नेसले (19,005), टाटा स्टील (1,164), लार्सन अँड टुब्रो (1,864) डॉक्टर रेड्डीज लॅब (4,606) टीसीएस (3,461),अॅक्सिस बँक (686), सन फार्मा (770) यांचेही भाव घसरले.

loading image
go to top