ओळखपत्र नसणाऱ्या 75 हजार नागरिकांचे लसीकरण; BMC च्या मोहीमेला यश | Corona vaccination update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

ओळखपत्र नसणाऱ्या 75 हजार नागरिकांचे लसीकरण; BMC च्या मोहीमेला यश

मुंबई : कोणत्याही प्रकारची कागदपत्रे (Documents) किंवा ओळखपत्र नसणाऱ्या (no identification) लोकांच्या लसीकरणासाठी (people vaccination) पालिकेने विशेष मोहीम (bmc special vaccination drive) राबवली होती. या मोहिमेंतर्गत 75 हजारांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (suresh kakani) यांनी दिली.

हेही वाचा: ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास धोकादायक; देहविक्रीसाठी तृतीयपंथीयांचे अड्डे

मुंबईत कोणत्याही प्रकारची कागदपत्र नसलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. लसीकरणाच्या सुरूवातीला या घटकांच्या लसीकरणाबाबत मोठा पेच होता. अशा घटकांसाठी महानगरपालिकेने सप्टेंबर महिन्यात विशेष मोहिमेचे आयोजन केले. या मोहिमेसाठी विशेष पथकाची नेमणूक केली गेली. त्यात डॉक्टर,परिचारीका, कर्मचाऱ्यांसह काही सामाजिक संघटनांचा समावेश देखील होता असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

अनाथआश्रम,देहविक्रेता महिला,तुरुंगातील कैदी,ट्रान्सजेंडर आणि बेघर लोकांकडे शक्यतो ओळखपत्र किंवा कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसतात. अशी दीड लाखाहून अधिक लोकं मुंबईत असण्याची शक्यता आहे. अशा लोकांचे ही लसीकरण व्हावे यासाठी सामाजिक संघटना मागणी करत होत्या. त्यानुसार राज्य सरकारने या लोकांचे ही लसीकरण सुरू केले. गेल्या अडीच महिन्यात 75 हजाराहून अधिक लोकांना लस देण्यात आल्याचे काकाणी पुढे म्हणाले.

मुंबईतील अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांचे लसीकरण जुलै महिन्यापासून सुरु करण्यात आले असून 19 नोव्हेंबर पर्यंत सुमारे 8 हजार 712 (54 %) रुग्णांना लस देण्यात आली आहे.यातील 3 हजार 945 (45 %) जणांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत.अंथरुणाला खिळलेल्या केवळ 4 हजार 500 रुग्णांनी स्वतःहून लसीसाठी नोंद केली. मात्र उर्वरित लोकांना पालिकेने माहिती घेऊन लस देण्यास सुरुवात केली असेही काकाणी म्हणाले.

loading image
go to top