"भारताची अर्थव्यवस्था हत्ती सारखीच, पण..."; महिद्रांचं नवं ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anand Mahidnra
"भारताची अर्थव्यवस्था हत्ती सारखीच, पण..."; महिद्रांचं नवं ट्विट

"भारताची अर्थव्यवस्था हत्ती सारखीच, पण..."; महिद्रांचं नवं ट्विट

कोरोना काळात डबघाईला गेलेली भारतीय अर्थव्यवस्था आता पुन्हा एकदा रुळावर येताना दिसते आहे. लॉकडाऊन काळात सर्वच प्रकारचे उद्योग धंदे बंद असल्याने सर्वच स्तरातील व्यवसायांवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेत मोठी मंदी पाहावी लागली होती. त्यानंतर आता अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल दिसून येता आहेत. याच गोष्टीवरून आनंद महिंद्रा यांनी एक खास ट्विट केलं आहे.

महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahidnra) हे आपल्या भन्नाट ट्विटसाठी चर्चेत असतात. अशातच त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचं चित्रं दाखवण्याता प्रयत्न केला आहे. "अनेकदा भारतीय अर्थव्यवस्था हत्ती सारखी असल्याचं म्हटलं जातं. मात्र अलीकडेच अर्थव्यवस्था सुधारली तेव्हा 'वाघ' असल्याचं म्हटलं गेलं." यावर ते म्हणाले की, "मात्र अर्थव्यवस्था हत्ती असली तरी त्याला आपण कधीही कमी समजू नये. कारण हा हत्ती वेगवेळ्या अडथळ्यांना पार करत जात असतो."

हेही वाचा: 'हा' देश बनवणार जगातील पहिली 'बिटकॉइन सिटी'!

आनंद महिद्रा यांनी हे मत व्यक्त करताना एक व्हीडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये एक हत्ती एक मोठ्या कुंपनाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. मोठ्या प्रयत्नानंतर तो हा अडथळा पार करून पुढे जातो.

loading image
go to top