थेट परकी गुंतवणुकीत भारताची पीछेहाट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 मे 2018

नवी दिल्ली: थेट परकी गुंतवणुकीत भारताची पीछेहाट झाली आहे. अमेरिकेतील ए. टी. केरनी या जागतिक गुंतवणूक विषयक सल्लागार संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार थेट परकी गुंतवणुकीत भारताचे स्थान तीन स्थानांनी खाली घसरले आहे. आठव्या स्थानावर असलेल्या भारताची पीछेहाट होऊन २०१५ नंतर प्रथमच गुंतवणूकयोग्य देशांच्या टॉप १० यादीमधून भारत बाहेर पडला आहे. भारताबरोबरच चीनच्या स्थानात देखील घसरण झाली आहे. देशातील राजकीय, आर्थिक आणि नियामक संस्थांच्या कामगिरीवरून गुंतवणूकयोग्य असे देशांचे मूल्यमापन केले जाते.  

अहवालानुसार, देशात होऊ घातलेल्या निवडणूकांचा परिणाम परकीय गुंतवणूकदारांवर होत आहे. तरीही भारतीय बाजारपेठ ही गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र राहील असेही  अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. जागतिक नाणेनिधीच्या अहवालाचा दाखला देऊन भारताचा आर्थिक विकास दर जगातील इतर कोणत्याही देशाच्या विकास दरापेक्षा जास्त असल्याचा उल्लेख अहवालामध्ये करण्यात आला आहे. 

देशाला परकी गुंतवणुकीची गरज 
भारतासाठी परकी गुंतवणूक अतिशय गरजेची आहे. देशातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठडी 1 ट्रिलियन डॉलरचा निधी आवश्‍यक आहे. यात बंदरे, विमानतळे, महामार्ग यांचा समावेश आहे. देशातील परकी गुंतवणुकीचा ओघ वाढल्यानंतर आर्थिक स्थिती सुधारण्यासोबत जागतिक चलनांच्या तुलनेत रुपयाची स्थितीही भक्कम होते.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India's ranking slips 3 notches to 11th spot on AT Kearney FDI index