अमेरिकेविरोधात भारताची ‘डब्ल्यूटीओ’त धाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली - पोलाद व ॲल्युमिनियन उत्पादनांच्या आयातीवर अमेरिकेकडून आकारल्या जाणाऱ्या भरमसाट शुल्काविरोधात भारताने जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) धाव घेतली आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी ‘डब्ल्यूटीओ’ने एक समिती स्थापन करावी, अशी मागणी भारताने केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने आज दिली. ‘डब्ल्यूटीओ’च्या तंटा निवारण यंत्रणेअंतर्गत चर्चेतून या समस्येवर समाधान शोधण्यात उभय देशांना अपयश आल्यानंतर भारताने हे पाऊल उचलले आहे. अमेरिकेची ही कृती नियमबाह्य असून, या संदर्भात आम्ही इतर देशांशीही चर्चा केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

नवी दिल्ली - पोलाद व ॲल्युमिनियन उत्पादनांच्या आयातीवर अमेरिकेकडून आकारल्या जाणाऱ्या भरमसाट शुल्काविरोधात भारताने जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) धाव घेतली आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी ‘डब्ल्यूटीओ’ने एक समिती स्थापन करावी, अशी मागणी भारताने केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने आज दिली. ‘डब्ल्यूटीओ’च्या तंटा निवारण यंत्रणेअंतर्गत चर्चेतून या समस्येवर समाधान शोधण्यात उभय देशांना अपयश आल्यानंतर भारताने हे पाऊल उचलले आहे. अमेरिकेची ही कृती नियमबाह्य असून, या संदर्भात आम्ही इतर देशांशीही चर्चा केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेच्या या कृतीचा फटका भारतातून होणाऱ्या निर्यातीला बसत असून, त्याचे पडसाद जागतिक व्यापारावरही उमटत असल्याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India's WTO against the United States