देशात मोदी लाट; शेअर बाजार सुसाट 

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मे 2019

मुंबई: लोकसभा निवडणूक निकाल येण्यास सुरवात झाली आहे. सुरवातीच्या अंदाजानुसार देशात पुन्हा मोदी लाट कायम असल्याचे दिसत आहे. याचे पडसाद शेअर बाजारात उमटलेले दिसत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 39 हजार 688.22 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. तर निफ्टीने 11 हजार 907 अंशांची उच्चांकी पातळी गाठली आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साह असून बाजारात चौफेर खरेदी सुरु आहे. 

सध्या सेन्सेक्स 453.53 अंशांच्या वाढीसह 39 हजार 563.74 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी 11 हजार 891.55 पातळीवर व्यवहार करतो आहे. तो 153.65 अंशांनी वधारला आहे. 

सध्या मुंबई शेअर बाजारात इंडियाबुल हाऊसिंग फायनान्स, इंडसइंड बँक, झी, एसबीआय आणि येस  बँकेचे शेअर प्रत्येकी 5.46 ते 2.87 टक्क्यांदरम्यान वधारले आहे. तर ओएनजीसी आणि सन फार्माच्या शेअरमध्ये किरकोळ घसरण झाली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indices open at record high as NDA leads in more than 272 seats; IndusInd Bank up 5%