esakal | IndusInd बँक घोटाळा प्रकरणी कार्वीच्या CEO ला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

IndusInd बँक घोटाळा प्रकरणी कार्वीच्या CEO ला अटक

ग्राहकांच्या ठेवी गहान ठेवून बँकेकडून घेण्यात आलेल्या पैशांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

IndusInd बँक घोटाळा प्रकरणी कार्वीच्या CEO ला अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - IndusInd बँक घोटाळा प्रकरण Karvy चे सीआओ राजीव रंजन आणि CFO जी कृष्ण हरी यांना अटक करण्यात आली आहे. हैदराबाद पोलिसांनी गुरुवारी घोटाळा प्रकरणात कार्वी स्टॉक ब्रेकिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली. ग्राहकांच्या ठेवी गहान ठेवून बँकेकडून घेण्यात आलेल्या पैशांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडसइंड बँकेच्या तक्रारीनंतर कार्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव रंजन सिंह आणि फायनान्सिअल ऑफिसर जी कृष्ण हरी यांना अटक केली. पोलिसांनी याआधी कार्वीचे अध्यक्ष सी पार्थसारथी यांना इंडसइंड बँकेचे १३७ कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याप्रकऱणी अटक केली होती.

नोव्हेंबर २०१९ मधअये सेबीने कार्वीला नवीन ब्रोकरेज ग्राहक घेण्यास रोखलं होतं. कारण कार्वीकडून ग्राहकांच्या २ हजार कोटी रुपयांहून अधिक कोटींच्या ठेवींचा गैरवापर केल्याचं समोर आलं होतं.

हेही वाचा: जबरदस्त! पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजराचा सेन्सेक्स ५८ हजारच्या पुढे

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने कार्वी स्टॉक ब्रेकिंगला डिफॉल्टर घोषित कऱण्यात आलं होतं. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजनेसुद्धा अशा प्रकारची कारवाई सुरु केली होती. त्यानंतर कंपनीने त्यांचे सदस्यत्व मागे घेतले होते.

loading image
go to top