esakal | जबरदस्त! पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजराचा सेन्सेक्स ५८ हजारच्या पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

Sensex-Sakal

जबरदस्त! पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजराचा सेन्सेक्स ५८ हजारच्या पुढे

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबई शेअर बाजाराची (Mumbai share market) जोरदार घोडदौड सुरु आहे. गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (sensex) ५८ हजारचा टप्पा ओलांडला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा १७,३०० च्या पुढे गेला आहे.

सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स २५३ अंकांनी वधारुन ५८,११५ वर पोहोचला. हा सार्वकालीन उच्चांक आहे. निफ्टीने सुद्धा रेकॉर्ड १७,३११.९५ ला स्पर्श केला.

हेही वाचा: शहनाज गिलने सिद्धार्थचा मृतदेह रुग्णालयात आणला - सूत्र

रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टायटन, एक्सिस बँक आणि लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

loading image
go to top