esakal | ऑगस्टमध्ये महागाई दरात वाढ; केंद्राने जाहीर केली आकडेवारी
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala Sitaraman

भारत सरकारने घाऊक मूल्याआधारित महागाईचे आकडे जाहीर केले आहेत. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये यात किरकोळ वाढ झाली आहे.

ऑगस्टमध्ये महागाई दरात वाढ; केंद्राने जाहीर केली आकडेवारी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारत सरकारने घाऊक मूल्याआधारित महागाईचे आकडे जाहीर केले आहेत. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये यात किरकोळ वाढ झाली आहे. जुलैमध्ये महागाई दर हा ११.१६ टक्के होता तो ऑगस्ट महिन्यात ११.३९ टक्के इतका झाला आहे.

याआधी जून महिन्यात १२.०७ टक्के महागाई दर होता. तर मे महिन्यात हेच प्रमाण १२. ९४ टक्के इतके होते. महागाई सलग पाचव्या महिन्यात दहापेक्षा जास्त आहे. महागाई वाढण्याचे कारण प्राथमिक वस्तुंसह इंधन आणि वीज दरात झालेली वाढ हे आहे.

हेही वाचा: गुजरातनंतर आणखी एका राज्यात भाजप मुख्यमंत्री बदलणार?

केंद्र सरकारने सोमवारी ऑगस्ट महिन्यातील CPI चे आकडे जारी केले होते. त्यात घसरण झाल्याचं दिसून आलं होतं. जुलैमध्ये सीपीआय ५.५९ टक्क्यावरून ऑगस्टमध्ये ५.३० टक्के इतकं खाली आले होते. यामुळेच महागाई दरात किरकोळ घट होण्याचे संकेत मिळाले होते.

घाऊक आणि किरकोळ महागाई म्हणजे काय?

होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजेच घाऊक मूल्याआधारीत महागाई ही घाऊक बाजारात एका व्यावसायिकाकडून दुसरा व्यावसायिक जे मूल्य आकारतो त्यावर असतं. त्याच्या तुलनेत कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजेच ग्राहक मूल्याआधारीत महागाई ही सर्वसामान्य ग्राहकांकडून देण्यात येणाऱ्या किंमतीवर आधारीत असते. याला रिटेल इन्फ्लेशन म्हणजेच किरकोळ महागाई म्हटलं जातं.

loading image
go to top