esakal | गुजरातनंतर आणखी एका राज्यात भाजप बदलणार नेतृत्व? मुख्यमंत्र्यांना बोलावलं दिल्लीला
sakal

बोलून बातमी शोधा

गुजरातनंतर आणखी एका राज्यात भाजप मुख्यमंत्री बदलणार?

दोन दिवस आधीच जराम ठाकुर हे दिल्लीहून शिमल्याला परतले होते. त्यावेळी केंद्रीय नेत्यांशी जयराम यांनी चर्चा केली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांना दिल्लीला बोलावण्यात आल्याने राज्यात चर्चेला उत आला आहे.

गुजरातनंतर आणखी एका राज्यात भाजप मुख्यमंत्री बदलणार?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शिमला - हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीला बोलावलं आहे. दोन दिवस आधीच जराम ठाकुर हे दिल्लीहून शिमल्याला परतले होते. त्यावेळी केंद्रीय नेत्यांशी जयराम यांनी चर्चा केली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांना दिल्लीला बोलावण्यात आल्याने राज्यात चर्चेला उत आला आहे. गुजरातमध्ये भाजपने केलेल्या नेतृत्वबदलानंतर मुख्यंंमंत्र्यांना तातडीने दिल्लीला बोलावल्याने आता राज्यात खांदेपालट होणार का अशी चर्चा होतेय.

गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर जयराम ठाकुर हे शिमल्याला पोहोचले. पण त्यांना लगेच पुन्हा दिल्लीला बोलावल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेस नेत्यांना यामुळे घेरण्यासाठी आयती संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांना हटवण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपने मात्र असं काही होणार नसल्याचं म्हटलं आहे. भाजप हिमाचलमध्ये २०२२ च्या निवडणुका जयराम यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी गेल्या आठवड्यात बुधवारी दिल्ली दौरा केला होता. बुधवारी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यानंतर जयराम ठाकुर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हिमाचल विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी निमंत्रण दिलं होतं. तसंच मध्य प्रदेशातील उज्जैनलासुद्धा ते गेले होते. रविवारी दिल्लीहून शिमल्याला आल्यानंतर आता तीन दिवसात पुन्हा दिल्लीला जात असून दुपारी जेपी नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहेत. हिमाचलमध्ये पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी ही भेट असल्याचा दावाही केला जात आहे. तसंच सरकार आणि संघटनेच्या कामासह इतर विषयांवरसुद्धा ही भेट असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा: आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण दु:खी - गडकरी

सोमवारी कुल्लूतील ढालपूर इथं काँग्रेसने रॅली केली होती. यावेळी काँग्रेस आमदार विक्रमादित्य सिंह यांनी म्हटलं की, उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरात प्रमाणे हिमाचल प्रदेशातही भाजप एका रात्रीत मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता आहे. राज्यात सरकारला आलेल्या अपयशाचं खापर मुख्यमंत्र्यांवर फोडलं जाईल. भाजपने काँग्रेसच्या नवऱ्याची चिंता करू नये. काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी हे ठरवतील की काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे असेल. गेल्या वर्षभरात भाजपने पाच मुख्यमंत्री बदलले आहेत असेही ते म्हणाले.

loading image
go to top