इन्फोसिसचा पाय आणखी खोलात? 

वृत्तसंस्था
Thursday, 24 October 2019

मुंबई: नियमबाह्य पद्धतीने कंपनीच्या ताळेबंदामध्ये फेरफार केल्याच्या आरोपावरून संकटात सापडलेल्या इन्फोसिसच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. इन्फोसिसमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप व्हिसलब्लोअरने केल्यानंतर अमेरिकी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (SEC) देखील चौकशीचे आदेश दिले आहेत. परिणामी इन्फोसिसच्या शेअरमध्ये आज पुन्हा 1.71 टक्क्यांची घसरण झाली. सध्या शेअर 639.50 रुपयांवर व्यवहार करतो आहे. 

दोन दिवसांपूर्वी इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांनी एका सत्रात तब्बल 53 हजार कोटी रुपये गमावले होते. 

कंपनीने आपले लेखापरीक्षण करताना चुकीच्या पद्धतीने आकडेवारी सादर केल्याचा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कंपनीचे सीईओ सलील पारेख आणि मुख्य अर्थविषयक अधिकारी नीलांजन रॉय यांच देखील यात समावेश आहे.

काय आहे प्रकरण? 
लेखापरीक्षणामध्ये नियम डावलण्यात आल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांच्या गटाने केला आहे. याप्रकरणी ईमेल आणि रेकॉर्डिंगसारखे सबळ पुरावे असून संचालक मंडळाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. व्हेरिझोन, एबीएम ऍमरो आणि जपानमधील संयुक्त उद्यम या व्यवहारांमध्ये महसूल दाखवताना नियमांचा भंग केला आहे. मोठ्या व्यवहारांमध्ये अनियमितता आणि हजारो कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

लेखापरीक्षकांनी तपासणी केल्यास महसुलातील गडबड आणि त्यातून मिळवलेल्या फायद्याची माहिती उघड होईल, असा दावा या कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाला लिहिलेल्या पत्रात केला आहे. दरम्यान, 2017 आणि 2018 मध्येही कंपनीतील सुशासनासंदर्भात जागल्यांनी आवाज उठविला होता. या आरोपात तथ्य आहे का, हे शोधण्यासाठी सेबीने एक समितीही नियुक्त केली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infosys explains why it didn't disclose whistleblower complaint to regulators