इन्फोसिसमध्ये गैरव्यवहार नाही

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

बंगळूर: कंपनीने ताळेबंदात फेरबदल केल्याच्या आरोपाची तपासणी लेखापरीक्षण समितीने केली असून, या आरोपात समितीला काही तथ्य आढळून आले नाही, असे इन्फोसिसने म्हटले आहे. 

बंगळूर: कंपनीने ताळेबंदात फेरबदल केल्याच्या आरोपाची तपासणी लेखापरीक्षण समितीने केली असून, या आरोपात समितीला काही तथ्य आढळून आले नाही, असे इन्फोसिसने म्हटले आहे. 

कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींचा गांभीर्याने विचार करून आणि स्वतंत्र समितीने चौकशी केल्यानंतर कोणत्याची प्रकारची अयोग्य कृती कंपनीच्या वरिष्ठांकडून झाली नसल्याचे इन्फोसिसचे लेखापरीक्षण समितीचे अध्यक्ष डी. सुंदरम यांनी म्हटले आहे. लेखापरीक्षण समितीच्या अहवालानंतर इन्फोसिसचे अकार्यकारी अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, की कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख आणि मुख्य वित्तीय अधिकारी निलंजन रॉय हे कंपनीच्या अभिमानास्पद वारशाचे पाईक आहेत. कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यात आणि गती वाढविण्यात सलील यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. मंडळाला विश्‍वास आहे, की ते कंपनीच्या नव्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडतील. 

 
काय होते प्रकरण? 
इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख आणि मुख्य वित्तीय अधिकारी निलंजन रॉय यांनी कंपनीच्या आर्थिक ताळेबंदातील आकडेवारी चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप कंपनीतीलच कर्मचाऱ्यांनी केला होता. त्याची दखल "सेबी' आणि "अमेरिकन स्टॉक एक्‍सचेंज कमिशन'ने घेतली होती. त्यानंतर कंपनीनेदेखील स्वतंत्रपणे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infosys gives clean chit to CEO Salil Parekh