विमा व गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 July 2019

सर्वसामान्य नागरिकांना विमा व गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांकडून योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘सकाळ मनी’ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘हेल्थ चेक-अप’ करून घेतो; त्याच धर्तीवर ‘वेल्थ चेक-अप’ किंवा ‘पोर्टफोलिओ चेक-अप’ करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे येत्या शनिवारी (ता. ६ जुलै) पुण्यात हा उपक्रम पुन्हा आयोजित केला जाणार आहे.

पुणे - सर्वसामान्य नागरिकांना विमा व गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांकडून योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘सकाळ मनी’ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘हेल्थ चेक-अप’ करून घेतो; त्याच धर्तीवर ‘वेल्थ चेक-अप’ किंवा ‘पोर्टफोलिओ चेक-अप’ करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे येत्या 
शनिवारी (ता. ६ जुलै) पुण्यात हा उपक्रम पुन्हा आयोजित केला जाणार आहे.

सामाजिक गरज लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतलेला असून, त्याअंतर्गत ‘सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर’ (सीएफपी) असलेली तज्ज्ञ मंडळी आर्थिक नियोजनाबद्दल तसेच विमा व अन्य गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या गुंतवणूकदारांना तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

‘सकाळ मनी’चा हा उपक्रम ६ जुलैला सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे अत्यावश्‍यक आहे. यासाठी ७४४७४५०१२३ या दूरध्वनी क्रमांकावर त्वरित मिस्ड कॉल देऊन ठेवावा. त्यानंतर संबंधितांशी स्वतंत्रपणे संपर्क साधला जाणार आहे. नावनोंदणी केलेल्यांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insurance Investment Technician Free Guidance