पोस्टातील 'या' योजनेत करा गुंतवणूक आणि कमवा लाखो रुपये!

वृत्तसंस्था
Friday, 11 September 2020

पोस्ट ऑफिसमधल्या योजना गुंतवणूकदारांसाठी सुरक्षितही असतात. यातील रकमेवर सार्वभौम हमीदेखील (Sovereign guarantee) मिळत आहे. सध्या पोस्ट ऑफिसच्या (Post Office) विशेष योजनांमध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) एक योजना आहे.

नवी दिल्ली: कोरोनाकाळात भारताची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. अशा काळात ज्यांना गुंतवणूक करायचे आहेत त्यांना आता एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसमधील छोट्या बचत (Small Savings Scheme) योजनामध्ये गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक आता ग्राहकांन मोठा फायदा होईल. या पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला एफडीच्या तुलनेत चांगले व्याज मिळू शकते. पोस्ट ऑफिसमधल्या योजना गुंतवणूकदारांसाठी सुरक्षितही असतात. यातील रकमेवर सार्वभौम हमीदेखील (Sovereign guarantee) मिळत आहे. सध्या पोस्ट ऑफिसच्या (Post Office) विशेष योजनांमध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) एक योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना एफडीपेक्षा चांगले व्याज मिळते आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 NSC (National Savings Certificate) योजनेमध्ये सध्या वार्षिक 6.8 टक्के व्याजदर मिळत आहे. या योजनेचा कार्यकाल 5 वर्षांचा आहे. महत्वाचे म्हणजे याची मॅच्यूरिटी पूर्ण झाल्यावरही आणखी 5 वर्षांसाठी याच्या कार्यकालात वाढ करता येऊ शकते. या योजनेत कोणीही पैश्यांची गुंतवणूक करु शकतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 ही राष्ट्रीय बचत सर्टिफिकेट ग्राहाकांना सध्या 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये आणि 10,000 रुपयांत उपलब्ध आहे. वेगवेगळ्या किंमतीचे कितीही एनएससी सर्टिफिकेट खरेदी करून ग्राहक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. यामध्ये कमीत कमी गुंतवणूक 100 रुपयांची करता येते. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नसून तुम्ही यामध्ये चांगले पैसे गुंतवू शकता.15 लाखाचे होतील 21 लाख-  जर गुंतवणूकदाराने या योजनेमध्ये 15 लाखाची गुंतवणूक केली तर 6.8 टक्के व्याजदराने ही रक्कम 20.85 लाख होईल. यामध्ये तुमची गुंतवणूक 15 लाखाची असल्याने तुम्हाला होणारा फायदा 6 लाखांचा असेल. तसेच इनकम टॅक्स कायदा 1961 सेक्शन 80 सी अंतर्गत NSCमध्ये वार्षिक 1.5 लाख पर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्समध्ये सूटही मिळते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Invest in this post office National Savings Certificate scheme and earn millions of rupees