Indian Railway : रेल्वेचा 'हा' अति स्वस्त शेअर देईल तगडा परतावा, तज्ज्ञांना विश्वास

Rail Vikas Nigam Limited
Rail Vikas Nigam Limitedesakal
Summary

अमेरिकेतील वाढत्या व्याजदर आणि मंदीमुळे शेअर बाजारात अतिशय अस्थिर वातावरण आहे.

अमेरिकेतील (America) वाढत्या व्याजदर आणि मंदीमुळे शेअर बाजारात अतिशय अस्थिर वातावरण आहे, त्यामुळे गुंतवणुकदार सध्या कमी जोखीम आणि जास्त नफा असलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत.

या सर्व गोष्टी एका शेअरमध्ये आहेत आणि तो शेअर म्हणजे भारतीय रेल्वेची (Indian Railway) लिस्टेड कंपनी रेल विकास निगम (Rail Vikas Nigam Limited). या स्टॉकमध्ये येत्या काळात वाढ होणार असल्याचा विश्वास शेअर बाजार तज्ज्ञ वर्तवत आहेत. हा समभाग 45% पर्यंत परतावा देईल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर रेल विकास निगम लिमिटेडचा शेअर 42 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा विश्वास ब्रोकरेज हाऊस आयडीबीआय कॅपिटने व्यक्त केला आहे. सध्या हा शेअर बीएसई इंडेक्सवर 30 रुपयांवर आहे.

Rail Vikas Nigam Limited
Share Marketमध्ये तेजी,आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांना दिलासा

40 ते 45 टक्के परताव्याची शक्यता

आताच्या किंमतीवरुन या शेअरवर 12 रुपये नफा म्हणजे तुम्हाला 40 ते 45 टक्के परतावा मिळू शकतो. ब्रोकरेजने या शेअरवर खरेदीचे रेटिंग कायम ठेवले आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटल 6,255 कोटी रुपये आहे. रेल विकास निगमने 210 अब्ज ऑर्डरसाठी बोली लावल्याचे आयडीबीआय कॅपिटलने म्हटले आहे. याशिवाय 60 अब्ज रुपयांच्या खुल्या निविदांपैकी 20 अब्ज रुपयांच्या ऑर्डर कंपनीच्या नावे आहेत. रेल विकास निगमने टाटा, महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड, जयकेसेमसारख्या कंपन्यांशी करार केला आहे. या आधारावर आगामी काळात शेअरची किंमत वाढण्याची शक्यता आहे. रेल विकास निगम लिमिटेड ही भारतीय रेल्वेच्या मालकीची PSU कंपनी आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com