FD Interest Rate : FD मध्ये गुंतवणूक करताय? जाणून घ्या कोणत्या बँका देत आहेत जास्त व्याज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FD Interest Rate

FD Interest Rate : FD मध्ये गुंतवणूक करताय? जाणून घ्या कोणत्या बँका देत आहेत जास्त व्याज

Fixed Deposit Interest Rate : जर तुम्हाला मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करायला आवडत असेल आणि तुम्ही या बँकांमध्ये दोन वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करत असाल, तर या बँका तुम्हाला 6.5% व्याजासह परतावा देत आहेत. जे बँक खात्याच्या व्याजदरापेक्षा जास्त आहे, ज्यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. लोक मोठ्या प्रमाणावर FD योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात.

खाली SBI, HDFC बँक, ICICI बँक आणि PNB यांसारख्या प्रमुख बँकांकडून 2 वर्षांच्या कालावधीसाठी पोस्ट ऑफिस मुदत ठेवींची तुलना केली आहे.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

पोस्ट ऑफिस मुदत ठेव :

इंडिया पोस्टने एफडीमध्ये गुंतवणुक करण्यासाठी चार ऑफर दिल्या आहेत त्यामध्ये : 1, 2, 3 आणि 5 वर्षे. किमान ठेव रक्कम 1,000 रुपये आहे आणि पैसे 100 च्या पटीत जमा केले पाहिजेत. पोस्ट ऑफिस 2 वर्षांच्या कालावधीसाठी 5.7% आणि 3 वर्षांच्या कालावधीसाठी 5.8% व्याज दर देते.

एसबीआई एफडी :

SBI 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 6.25% व्याज दर देते.

एचडीएफसी बँक एफडी :

एचडीएफसी 2 वर्षे ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी 6.50% व्याज दर देते.

आयसीआयसीआय बँक एफडी :

ICICI बँक 6.50% व्याज दर 2 वर्षे ते 3 वर्षांच्या कालावधीत देते.

हेही वाचा: Job Cuts : मंदीचे सावट! भारतातील सर्वात मोठ्या कंपनीने दिला 20,000 कर्मचाऱ्यांना नारळ

पीएनबी एफडी

PNB बँक 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 6.25% व्याज दर ऑफर करते.

वाढत्या व्याजदरामुळे, बँका 2 वर्षांच्या कालावधीसाठी पोस्ट ऑफिस मुदत ठेवींच्या तुलनेत जास्त व्याज दर देतात. बँकांमध्ये, एचडीएफसी, आयसीआयसीआय सारख्या खाजगी बँका सार्वजनिक क्षेत्रातील बँका एसबीआय आणि पीएनबीपेक्षा 25 बेसिस पॉइंट जास्त व्याजदर देतात.

तुम्ही तुमची बँक FD मुदतीपूर्वी काढता तेव्हा बँका दंड आकारतात. बँकेने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींनुसार अधिकृत कालावधी दरम्यान तुम्ही एफडी कधी काढता यावर दंड अवलंबून असतो.