Investment | EPF, PPF की NPS ? कोणत्या योजनेतून मिळेल चांगला परतावा ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Investment

Investment : EPF, PPF की NPS ? कोणत्या योजनेतून मिळेल चांगला परतावा ?

मुंबई : PF, EPF, PPF आणि NPS बद्दल अनेकांच्या मनात अनेकदा गैरसमज असतात. लोकांना प्रश्न पडतो की पीएफप्रमाणेच सरकार एनपीएसचे खाते का उघडत नाही ? सेवानिवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि बचत करण्यासाठी बरेच लोक EPF म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि NPS मध्ये गुंतवणूक करतात.

EPF आणि NPS दोन्ही भविष्यातील गुंतवणूक योजना पूर्ण करतात. परंतु, ईपीएफ निवृत्तीनंतर ठरावीक रक्कम मिळण्याची हमी देतो, परंतु ही रक्कम एनपीएसमध्ये उपलब्ध असू शकते किंवा नसू शकते.

हेही वाचा: EPFO : PF कर्मचाऱ्यांना लॉटरी; या दिवशी खात्यात येणार ६४ हजार रुपये

तुमच्या पगाराचा काही भाग दरमहा ईपीएफमध्ये जमा केला जातो. त्याच वेळी, नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) ही सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 10 टक्के पगार आणि 14 टक्के एनपीएसमध्ये जमा करावे लागतात.

ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशनचे अध्यक्ष शैलेंद्र दुबे म्हणतात, देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS योजना 2005 पासून लागू करण्यात आली. जुन्या पेन्शन योजनेच्या जागी ही योजना आली.

NPS मध्ये कर्मचार्‍यांच्या पगारातून 10 टक्के कपात केली जाते आणि 14 टक्के रक्कम कर्मचार्‍याला दरमहा स्वतः जमा करावी लागते. यानंतरही ही २४ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळेलच याची शाश्वती नाही.

हेही वाचा: EPFO खात्याचे हे काम लवकर पूर्ण करा; अन्यथा होईल ७ लाखांचे नुकसान

NPS आणि EPF मधील फरक

दुबे पुढे म्हणतात, 'हे पैसे का उपलब्ध होणार नाहीत, असे विचाराल, तर उत्तर असे की, आपण एनपीएसमध्ये जे पैसे जमा करतो ते मार्केटला दिले जातात. तीन लोकांची एक समिती आहे, जी हा पैसा शेअर बाजारात गुंतवण्याचा निर्णय घेते.

हे पैसे तुम्हाला कुठे गुंतवायचे आहेत, असेही कर्मचाऱ्यांना विचारले जाते. कर्मचार्‍यांसोबत सामंजस्य करार केल्यानंतर, 24 टक्के हिस्सा शेअर बाजारात गुंतवला जातो. तुमच्या सेवानिवृत्तीच्या वेळी शेअर बाजाराची स्थिती बिघडली तर तुमचे पैसे वाया जातील किंवा गमावले जातील किंवा तुम्हाला फार थोडे पैसे मिळतील याची शाश्वती नसते.

EPF आणि PPF योजनांमधील फरक

हे लक्षात घेण्यासारखे आहे की EPF आणि PPF या दोन्ही सरकारच्या बचत योजना आहेत. EPF चे व्यवस्थापन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) नावाच्या सरकारी संस्थेद्वारे केले जाते, तर PPF थेट सरकारद्वारे व्यवस्थापित केले जाते.

या दोन्ही योजनांचे फायदे आणि तोटे देखील आहेत. EPFO कडून दरवर्षी जमा होणाऱ्या पैशांपैकी 15% रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली जाते. उर्वरित रक्कम सरकारी रोख्यांमध्ये गुंतवली जाते. ईपीएफला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणूनही ओळखले जाते. संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने स्थापन केलेली ही बचत योजना आहे. याचा व्याजदर 8.10% आहे.