बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीची संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

पुणे - बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडाने बीएनपी पारिबास डायनॅमिक इक्विटी फंड बाजारात आणला आहे. या योजनेअंतर्गत इक्विटी, कॅश फ्युचर/ आर्बिट्राज, मनी मार्केट आणि डेट फंडामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा फंड गुंतवणूकीसाठी खुला झाला असून फंडाचा एनएफओ 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान खुला असणार आहे. 

कार्तिकराज लक्ष्मणन आणि अभिजित डे इक्विटी फंडाचे व्यवस्थापन करणार आहेत तर मयांक प्रकाश डेट फंडातील गुंतवणूक सांभाळणार आहेत. या फंडासाठीची किमान गुंतवणूक रक्कम 5,000 रुपये आहे. बेंचमार्क क्रिस्टल हायब्रीड 35+65 नुसार इक्विटी आणि डेट फंडामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे.  या फंडसाठी एन्ट्री लोड लागू असणार नाही. मात्र, 12 महिन्यांच्या आत जर या योजनेतून गुंतवणूकदारांनी 10 टक्क्यांपेक्षा जास्त पैसे काढून घेतले तर 1 टक्का एक्झिट लागणार आहे. 12 महिन्यानंतर गुंतवणूक काढल्यास कोणताही अतिरिक्त शुल्क आकारला जाणार नाही. 

डायनॅमिक इक्विटी फंड बाजारमूल्य वाढले की इक्विटीमध्ये कमी प्रमाणात गुंतवतात. याउलट बाजारमूल्य घसरले की इक्विटीतील गुंतवणूक वाढवतात. यातील इक्विटीचे प्रमाण हे मोजणीच्या पद्धतीनुसार बदलते. मात्र प्रत्येक फंड गुंतवणुकीची वेगवेगळी पद्धत वापरतो. ही पद्धत एकतर निफ्टी पीईवर आधारित असते किंवा मत्तावाटपाच्या स्वतःच्या पद्धतीवर आधारित असते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investment Opportunities in BNP Paribas Mutual Fund