Investment Tips : मार्च संपायला सहा दिवस बाकी; गुंतवणूक करा आणि कर वाचवा, कसे ते वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Investment Tips

Investment Tips : मार्च संपायला सहा दिवस बाकी; गुंतवणूक करा आणि कर वाचवा, कसे ते वाचा

मार्च महिना आणि गुंतवणूक म्हणजे परीक्षा आणि शेवटी अभ्यास असाच म्हणावं लागेल. आपण सर्वानी बचत आणि गुंतवणूक हि सतत चालणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

                                   श्रीमंत असाल तर गुंतवणूक करा,

                                      गरीब असाल तर बचत करा.

आपले उत्पन्न वाढले तर त्याप्रमाणे राहणीमानात थोडा बदल करून खर्च थोडा वाढविण्यास हरकत नाही पण त्या पटीत गुंतवणूक देखील वाढायला पाहिजे हे महत्वाचे.दिवसेंदिवस वाढणारी महागाई तुमच्या संपत्तीवर आर्थिक ताण आणते हे कायम ध्यानात ठेवले पाहिजे.

आपल्याकडे मार्च महिना म्हणजे बचतीचा महिना म्हणून पहिले जाते कारण जीवन विमा, आरोग्य विमा, आणि  म्युच्युअल फंड यामध्ये प्रचंड गुंतवणूक होते. आपल्याकडे आयकारचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे असते. त्यामुळे जर आपण ३१ मार्च पूर्वी गुंतवणूक केली तर आपल्याला आयकरातून योग्य प्रमाणात सूट मिळते. बचतीला प्रोत्साहन देणे व सरकार वेगवेगळ्या कारणांसाठी लागणारा निधी उभा करणे असा यामागचा दुहेरी हेतू आहे.

एसआयपी माध्यमाने दीर्घकालीन गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड गुंतवणूकदार नेहमी बाजार पडला तर काय होईल या चिंतेत असतात. बाजाराची वेळ आणि अस्थिरता या सारख्या म्युच्युअल फंडस् मधील काही जोखमींवर मात करण्यासाठी एसआयपी उत्तम प्रकारे काम करतात.

आपण एसआयपीच्या माध्यमाने म्युच्युअल फंड मध्ये नियमितपने गुंतवणूक करून बाजारातील चढ, उतारांवर मात करू शकता. जेव्हा एनएव्ही कमी असते,तेव्हा आपण अधिक युनिट्स खरेदी करता.आणि तसेच ह्याच्या उलट सुद्धा होते.जर एनएव्ही मध्ये चढ, उत्तर होत असले तर दीर्घकालीन मध्ये प्रत्येक युनिटचा भाव सरासरी प्रमाणे असतो. दीर्घकाळामध्ये जर बाजारामध्ये चढ आणि उतार दोन्ही होत राहिले तर प्रत्येक युनिटमागचा सरासरी दर कमी होईल. आणि परताव्यातील चढ-उतार सुद्धा कमी होईल.

मार्च महिना सुरु झाल्यानंतर सर्व गुंतवणूकदार (टॅक्स) नियोजनाच्या कामामध्ये गुंतून जातात. या काळामध्ये गुंतवलेले पैसे अधिक परताव्यासह मिळावेत अशा योजनांचा शोध प्रत्येक गुंतवणूकदार घेत असतो. हे लोक जबरदस्त परताव्यासह करामध्ये सवलतही मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात.

अशावेळी बहुतांश लोक कर बचत व्हावी यासाठी आयकर विभागाच्या कलाम ८० सी ची मदत घेतात. या कलमानुसार गुंतवणूकदारांना यामध्ये १. ५ लाख रुपयांची सूट मिळते. आयकर कायदा १९६१ कलम ८०सी नुसार कर वाचवू शकतो.  जर तुम्हाला पैसे गुंतवून जोखीम न पत्करता कर बचत करायची असेल तर तुम्ही या पर्यायांचा विचार करू शकता.

जीवन विमा

आयकराने आपल्या किंवा पत्नी आणि अपत्यांच्या नावावर जीवन विमा खरेदी केला तर आपला आयकर वाचवू शकतो. जीवन विमा हा बचत व गुंतवणूक आणि संरक्षण यांचा त्रिवेणी संगम आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. बरेच लोक हे फक्त आयकर वाचविण्यासाठी विमा खरेदी करतात. परंतु आपल्या जीवन मूल्यांचा विचार करता जीवन विमा घेणारी व्यक्ती आपल्याला क्वचितच भेटते.

त्यामुळे आपण ३१ मार्च पूर्वी आयकर वाचविण्यासाठी गुंतवणूक करावी तसेच, आणखी एक फायदा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे विमा कंपनी आपल्या विमा धारकांना प्रति वर्षी बोनस जाहीर करते ज्या विमा धारकांची पोलिसी ३१ मार्च पूर्वी खरेदी केलेली असते त्यांना जास्तीत जास्त बोनसचा फायदा घेता येतो.   त्यामुळे ३१ मार्च पूर्वी गुंतवणूक करून आपला टॅक्स वाचवा.

मार्च महिन्यात सर्व कर आपल्याला भरावा लागतो

मार्च महिन्यात सर्व कर आपल्याला भरावा लागतो

सुकन्या समृद्धी योजना

सदरची योजना फक्त ० ते १० वाया पर्यंतच्या मुलींसाठी आहे. पालकांची मुलांच्या नावे पोस्टात अथवा सरकारी बँकेत सदरचे खाते सुरु करता येते. सदरच्या योजनेचा परतावा साधारणपने ७% आहे. व यातील रक्कम तुम्हाला मुलीचे वय १८ झाल्याशिवाय काढता येत नाही. वार्षिक किमान ५००/- रु भरून सदरचे खाते नियमित सुरु ठेवता येते.

म्युच्युअल फंड

कर बचत करणारे विशिष्ट प्रकारचे फंड खरेदी करून आपला आयकर बचत करू शकतो. याचा सरासरी परतावा १२% ते १५% पर्यंत असतो आणखी फळ गोष्ट यामध्ये लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे यामध्ये केलेली गुंतवणूक ३ वर्षासाठी स्थगित असतो म्हणजेच यातील गुंतवणूक आपण करू शकत नाही किंवा त्यावर कर्ज देखील मिळत नाही.

बँक मुदत ठेव

सरकारी बँकेमध्ये आपण ५ वर्ष पर्यंतची मुदत ठेव ठेऊन कर वाचवू शकतो, परंतु याचा परतावा ६%  ते ७% असतो व लॉक इन पिरियड ५ वर्षे असतो. व सदर ठेवीवर कर्ज देखील मिळत नाही.

घर कर्ज परतफेड

गृह कर्जाची परतफेड केल्यानंतर व्याजाची कर सवलत कलम २४ नुसार होते व मुद्दल परतफेड कलाम ८० सी नुसार घेता येते. वरील बाबींचा विचार करून आपली गुंतवणूक ३१ मार्च पर्यंत करून आपला कर वाचवा.

लेखन- अमोलदादा पाटील (टॅक्स कन्सल्टंट)