‘संयम ठेवणाऱ्यालाच खरा फायदा’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर - शेअर बाजारातील चढ-उतारांकडे दुर्लक्ष करून जो गुंतवणुकीत सातत्य आणि संयम ठेवतो, तोच दीर्घकाळात खऱ्या अर्थाने पैसा कमावतो. त्यामुळे आपल्याला संपत्ती निर्माण करायची असेल तर म्युच्युअल फंडाचा मार्ग दीर्घकाळासाठी निवडायला हवा, असे एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे उपाध्यक्ष अशोक कानावाला यांनी येथे सांगितले.

‘सकाळ मनी’ आणि एचडीएफसी म्युच्युअल फंड यांच्या वतीने आयोजित गुंतवणूकदार जनजागृतीपर कार्यक्रमात ते बोलत होते.  

गुंतवणूक करण्यापूर्वी आपले आर्थिक उद्दिष्ट निश्‍चित केले पाहिजे, असे सांगताना कानावाला यांनी इक्विटी या ॲसेट क्‍लासने दीर्घकाळात किती चांगला परतावा दिलेला आहे, हे सोदाहरण स्पष्ट केले. बाजारातील तात्कालिक घसरणीमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. उलट घसरत्या बाजारात आपली गुंतवणूक होत राहिली पाहिजे. दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास चक्रवाढीचा मोठा लाभ होत जातो, असे नमूद करून ते म्हणाले, की म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी अतिशय सोपा ॲसेट क्‍लास आहे. लघू किंवा मध्यम कालावधीत त्याच्या परताव्याचा अंदाज बांधणे शक्‍य नाही. मात्र, दीर्घकाळात ते शक्‍य आहे. ‘इक्विटी’तून अधिकाधिक परतावा मिळविण्यासाठी संयमाची नितांत गरज आहे. जो यात शांत राहून, संयम ठेवून गुंतवणूक करतो, तोच दीर्घकाळात कमावतो.

‘सकाळ मनी’चे संपादक मुकुंद लेले यांनी प्रास्ताविकात ‘सकाळ मनी’मागची भूमिका स्पष्ट केली आणि प्रमुख वक्‍त्यांचा परिचय करून दिला. या प्रसंगी ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक श्रीरंग गायकवाड, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, ‘सकाळ मनी’चे शाखाप्रमुख मयूर सांगावकर, एचडीएफसी म्युच्यअल फंडाचे शाखाप्रमुख महेश कुलकर्णी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investor awareness program in kolhapur