मंदीत चांदी; गुंतवणूकदार दोन दिवसांत मालामाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले असून, शुक्रवार (ता.20) आणि सोमवार या दोन दिवसांत त्यांची मालमत्ता 10.35 लाख कोटी रुपयांनी वाढली.

नवी दिल्ली ः शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले असून, शुक्रवार (ता.20) आणि सोमवार या दोन दिवसांत त्यांची मालमत्ता 10.35 लाख कोटी रुपयांनी वाढली.

केंद्र सरकारने कंपनी करात कपात करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतल्यापासून शेअर बाजारात तेजीचे वारे निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीवर सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा चांगला परिणाम शेअर बाजारावर होत आहे. गुंतवणूकदारांमध्ये तयार झालेले सकारात्मक वातावरण कायम असल्याने मागील सत्रात सेन्सेक्‍सने दशकभरात एकाच दिवसात झालेली सर्वाधिक वाढ नोंदविली होती.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज 1 हजार 75 अंशांनी वधारून 39 हजार 90 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 326 अंशांनी वाढून 11 हजार 603 अंशांवर बंद झाला. सलग दोन सत्रांत झालेल्या जोरदार वाढीमुळे शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल 10.35 लाख कोटी रुपयांनी वाढले. बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल आज 148 लाख 89 हजार 652 कोटी रुपयांवर पोचले.

व्यवहार शेवटची दहा मिनिटे बंद
राष्ट्रीय शेअर बाजारातील व्यवहार आजच्या सत्रात शेवटच्या दहा मिनिटांत होऊ शकले नाहीत. तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाल्याने गैरसोय झाल्याची तक्रार शेअर दलालांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investor wealth zooms Rs 10.50 lakh crore in two days of market rally