गुंतवणूकदार झाले ३ लाख कोटींनी मालामाल; दिवसअखेर सेन्सेक्सची ८७९ अंशांची झेप

पीटीआय
Monday, 1 June 2020

देशात मॉन्सूनचे आगमन आण दीर्घकाळापासून सुरु असलेले लॉकडाउन टप्याटप्यात शिथिल करण्याची सरकारची घोषणेने सोमवारी भारतीय शेअर बाजाराची आठवड्याची सुरुवात सकारात्मक झाली.शेअर बाजारात तेजीची लाट होती.

मुंबई - देशात मॉन्सूनचे आगमन आण दीर्घकाळापासून सुरु असलेले लॉकडाउन टप्याटप्यात शिथिल करण्याची सरकारची घोषणेने सोमवारी भारतीय शेअर बाजाराची आठवड्याची सुरुवात सकारात्मक झाली. गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केल्याने शेअर बाजारात तेजीची लाट होती.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८७९ अंशांनी वधारून३३,३०३ अंशांवर बंद झाला. तर,  राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात २५४ अंशांची वाढ झाली. तो ९,८२६ अंशांवर बंद झाला. गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवल्याने गेल्या आठवड्यात सलग चार सत्रात शेअर बाजार सकारात्मक पातळीवर बंद झाला. चार दिवसात सेन्सेक्स २ हजार अंशापेक्षा अधिक वधारला आहे. दिवसभरात सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे १,१२० आणि ३३१ अंशांनी वधारला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गुंतवणूकदार ३ लाख कोटींनी मालामाल 

आजच्या सत्रात गुंतवणूकदार ३ लाख कोटींनी मालामाल झाले आहेत. मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजार भांडवल १३०.५ लाख कोटी रुपयांवर पोचले. ते गेल्या सत्रात १२७.६ लाख कोटी रुपये होते. 

क्षेत्रीय पातळीवर बँका, वित्त संस्था, आयटी कंपन्या, एफएमसीजी, ऑइल अँड गॅस आदी क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु होता. बँक निर्देशांकात ४ टक्क्यांची वाढ झाली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सेन्सेक्सच्या मंचावर
ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक, टाटा स्टील, एसबीआय, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, ओएनजीसी, आयटीसी, एचडीएफसी बँक एचयूएल, एलअँडटी , आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, कोटक बँक, एशियन पेंट्स, एनटीपीसी, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचे  शेअर सर्वाधिक तेजीत होते.

कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता सातव्या स्थानी; कोणाला टाकले मागे?

जागतिक पातळीवर:
अमेरिकेमध्ये वर्णभेदावरून वातावरण तापले आहे. शिवाय जगभरात अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धावरून चिंतेचे वातावरण आहे. जागतिक बाजारात सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली. त्यामध्ये १६ सेंटची घसरण कच्च्या तेलाचा भाव ३७.६६ डॉलरवर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investors gained 3 lac crore rupees; Sensex ends 879 points higher