कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता सातव्या स्थानी

Covid-19 India surpasses France Germany becomes 7th most-affected country in world
Covid-19 India surpasses France Germany becomes 7th most-affected country in world

नवी दिल्ली : कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता सातव्या स्थानी पोहोचला आहे. भारतामध्ये रविवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार करोनाचे १ लाख ९० हजार ६०९ रुग्ण आहेत. ही आकडेवारी आल्यानंतर भारताने फ्रान्सला मागे टाकले असून भारत आता सातव्या स्थानावर पोहोचला आहे. फ्रान्समध्ये करोनाचे १ लाख ८८ हजार ८८२ रुग्ण आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भारत आता नवव्या क्रमांकावरुन थेट सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका अद्याप कायम असून अमेरिकेत कोरोनाचे १८ लाख रुग्ण आहेत. यानंर ब्राझील आणि रशियाचा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये करोनाचे पाच लाख तर रशियात करोनाचे चार लाख रुग्ण आहेत. रविवारी देशात कोरोनाच्या ८३८० नव्या रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. एका दिवसात पहिल्यांदाच आठ हजाराचा आकडा पार झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूंची संख्यादेखील पाच हजारहून जास्त झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये १९३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण ५,१६४ रुग्णांचा आत्तापर्यंत भारतात मृत्यू झाला आहे.य

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ४१६४ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ४७.७६ टक्के आहे. देशभरात ८९९९५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. देशात गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत आहे. एकीकडे भारत गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला लॉकडाउन शिथील करत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

जगातील टॉपचे सात कोरोनाग्रस्त देश

  • अमेरिका
  • ब्राझिल
  • रशिया
  • स्पेन
  • इंग्लंड
  • इटली
  • भारत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com