12 रुपयांवरुन 4,300 वर पोहोचला 'हा' शेअर; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश.. | Share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

12 रुपयांवरुन 4,300 वर पोहोचला 'हा' शेअर; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश..

एशियन पेंट्स  (Asian Paints) 3.28 ही देशातील सर्वात मोठी पेंट कंपनी असून तिची मार्केट व्हॅल्यू 3.28 लाख कोटी रुपये आहे. एशियन पेंट्स शेअर बाजारातील अशा काही कंपन्यांपैकी आहेत ज्यांनी गेल्या दोन दशकात आपल्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे. एशियन पेंट्सने 1999 पासून आपल्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 290 पट वाढ केली आहे.

एशियन पेंट्सचा शेअर काल एनएसईवर 1.36 टक्क्यांनी वाढून 4,364.00 रुपयांवर बंद झाला. पण, सुमारे 23 वर्षांपूर्वी, 1 जानेवारी 1999 रोजी, जेव्हा एशियन पेंट्सच्या शेअर्सने एनएसईवर व्यवहार करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याची किंमत फक्त 11.88 रुपये होती. अशाप्रकारे, गेल्या 23 वर्षांत शेअरची किंमत 28,721.55 टक्क्यांनी वाढली आहे. (Investors made a big profit on this share check here stock or share market update)

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 जानेवारी 1999 रोजी एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये 23 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्या 1 लाखाची किंंमत 28,721.55% ने वाढून 2.88 कोटी रुपये झाली असती. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 जानेवारी 1999 रोजी एशियन पेंट्सच्या स्टॉकमध्ये फक्त 35 हजार रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्या 35 हजार रुपयांचे 1 कोटी रुपये झाले असते.

गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 2.20 टक्क्यांनी घसरण झाली आहे, तर गेल्या सहा महिन्यांत त्याच्या शेअर्सची किंमत केवळ 1.83 टक्क्यांनी वाढली आहे. पण, गेल्या 5 वर्षांमध्ये, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 174.91 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

एशियन पेंट्सचा  (Asian Paints) कंसोलिडेटेड निव्वळ नफा वार्षिक आधारावर 80.4 टक्क्यांनी वाढून FY2023 च्या जून तिमाहीत 1,036 कोटी झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 574.30 कोटी होता. दुसरीकडे, कंपनीचे कंसोलिडेटेड उत्पन्न जूनच्या तिमाहीत 54 टक्क्यांनी वाढून 8,607 कोटी रुपये झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 5,585.36 कोटी रुपये होते.

कंपनीचा EBITDA आर्थिक वर्ष 2023 च्या जून तिमाहीत वार्षिक आधारावर 88.65 टक्क्यांनी वाढून 913.56 कोटी रुपये झाला आहे, तर कंपनीचे मार्जिन जूनच्या तिमाहीच्या तुलनेत 194 bps ने वाढून 10.61 टक्क्यांवर पोहोचले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.