गुंतवणुकदारांचे पैसे अवघ्या 6 दिवसांत दुप्पट, या शेअरने दिला 101% परतावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

गुंतवणुकदारांचे पैसे अवघ्या 6 दिवसांत दुप्पट, या शेअरने दिला 101% परतावा

मुंबई : टाटा ग्रुपच्या अनेक स्टॉक्सने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. यातच आता आणखी एका टाटाच्या शेअरच्या समावेश झाला आहे. टीआरएफ लिमिटेड (TRF Ltd) स्मॉलकॅप स्पेसच्या शेअरने अवघ्या 6 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत.

मंगळवारी, या शेअरमध्ये सलग सहाव्या दिवशीही अप्पर सर्कीट लागले. मंगळवारीही, एनएसईवर 340.55 रुपयांच्या शेअरमध्ये 5 टक्के अप्पर सर्कीट लागले.

6 दिवसांत पैसे दुप्पट

टीआरएफ लिमिटेडचा शेअर 20 सप्टेंबर 2022 रोजी 340.55 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. याआधी, 12 सप्टेंबर 2022 च्या ट्रेडिंग सत्रात, शेअरची किंमत 168.8 रुपयांवर होती.

अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना फक्त 6 ट्रेडिंग सत्रांमध्ये 101 टक्के परतावा मिळाला. म्हणजेच या शेअरमध्ये 6 दिवसांपूर्वी कोणी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 2 लाखांपेक्षा जास्त झाली असती. टीआरएफ लिमिटेडची (TRF Ltd) सध्याची बाजारपेठ 373.73 कोटी रुपये आहे.

या वर्षी आतापर्यंत हा शेअर सुमारे 149 टक्क्यांनी वाढला आहे. या दरम्यान, हा शेअर 136.80 रुपयांवरुन (3 जानेवारी 2022) 340.55 रुपयांपर्यंत (20 सप्टेंबर 2022) वाढली. गेल्या वर्षभरातही हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. एका वर्षात त्याने सुमारे 185 टक्के परतावा दिला आहे.

कंपनीचा व्यवसाय

टीआरएफ लिमिटेड (TRF Ltd) बल्क मटेरियल हँडलिंग इक्विपमेंटसाठी विविध इलेक्ट्रोमेकॅनिकल काम करते. ही कंपनी इंफ्रास्‍ट्रक्‍चरर स्‍ट्रक्‍चर अँड फॅब्रिकेशन्स, लाइफ सायकल सर्व्हिसेज आणि एलाईड सर्व्हिसेजमध्येही आहे.

या कंपनीची स्थापना 20 नोव्हेंबर 1962 रोजी झाली. ही कंपनी टाटा स्टील आणि एसीसी लिमिटेडची प्रमोटेड कंपनी आहे. गेल्या पाच दशकांपासून टीआरएफ लिमिटेड ही कंपनी टाटा स्टील, टाटा पॉवर, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, सेल, भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड, कृष्णपट्टणम पोर्टसारख्या कंपन्यांना व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेज पुरवते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

Web Title: Investors Money Doubled In Just 6 Days This Stock Gave 101

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Share MarketStock