सणासुदीच्या दिवसात ट्रॅव्हल सेक्टरला येणार बहर | Travel Industry Shares | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

travel sector

Travel Industry: सणासुदीच्या दिवसात ट्रॅव्हल सेक्टरला येणार बहर

सणासुदीला सुरुवात झाली आहे आणि अशात लोकांची वर्दळ वाढणार आहे. प्रत्येक वर्षी ऑक्टोबर ते मार्च या काळात पर्यटकांची संख्या वाढते. अशात प्रवास आणि संबंधित उद्योगांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यामुळेच गुंतवणुकदारांनी ट्रॅव्हल इंडस्ट्रीशी संबंधित शेअर्सवर फोकस ठेवावा असे तज्ज्ञांनी सुचवले आहे. (Investors should be focus on shares of travel industry)

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारातील घसरणीला मोठा ब्रेक, सेन्सेक्समध्ये 598 अंकाची तेजी

कोरोना काळात ट्रॅव्हल इंडस्ट्री अवस्था सर्वात वाईट होती. गेल्या 2 वर्षांत प्रवास आणि संबंधित सेक्टरवर वाईट परिणाम झाल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत जेव्हा कोरोनापासून दिलासा मिळाल्यावर लोकं बाहेर पडण्याचा विचार करत आहेत.

RateGain च्या अहवालानुसार, ट्रॅव्हल इंडस्ट्रीला सणासुदीचा मोठा फायदा होणार आहे. यामध्ये सर्वात मोठा फायदा विमानतळ आणि मोठ्या राज्यांना होणार आहे. फेस्टिव्ह सीझनमुळे देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी वाढणार असल्याने टूर आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीत या वर्षी मजबूत रिकव्हरी दिसेल.

हेही वाचा: Stock Market : आज सेन्सेक्स 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 57, 823 वर उघडला

केवळ मुंबई आणि दिल्ली विमानतळांवरच 25 लाखांच्या पुढे गर्दी होऊ शकते. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दोन्ही विमानतळांवर 2.5 दशलक्ष लोकांची गर्दी होऊ शकते. फूटफॉलच्या आकड्यांबद्दल बोलायचे तर, 2019 च्या तुलनेत यंदा ही संख्या 17 टक्के जास्त असू शकते. एवढेच नाही तर विदेशी पर्यटकांची संख्याही यंदा वाढणार आहे. यामध्ये अमेरिका, युरोप आणि पश्चिम आशियामधून पर्यटक येण्याची शक्यता आहे.

आता ड्रीमफोल्क्स सर्व्हिसेसचा (Dreamfolks Services) शेअर फोकसमध्ये असेल. ही कंपनी विमानतळ एग्रीगेटर प्लॅटफॉर्म सुविधा देते. हा स्टॉक सोमवारीच लिस्ट झाला आहे. इंटरग्लोब एव्हिएशन आणि स्पाईसजेटचा समावेश असलेले एव्हिएशन स्टॉक्सदेखील फोकसमध्ये राहतील. हॉटेल कंपन्यांच्या खोलीचे एव्हरेज रूम रेंट आणि ऑक्युपन्सी लेव्हल दोन्हींमध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत इंडियन हॉटेल्स आणि ईआयएच लिमिटेडच्या शेअर्सवर फोकस असेल.

हेही वाचा: Stock Split: स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय? शेअरहोल्डरला कसा होतो फायदा?

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Investors Should Be Focus On The Shares Of Travel Industry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..