esakal | व्होडाफोन-आयडियाच्या शेअर्समध्ये 5 दिवसांत 40 टक्क्यांनी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

व्होडाफोन-आयडियाच्या शेअर्समध्ये 5 दिवसांत 40 टक्क्यांनी वाढ

गेल्या काही काळापासून व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे शेअर घाट्यात होते, मात्र या शेअरमध्ये आता पुन्हा एकदा जबरदस्त वाढ बघायला मिळते आहे.

व्होडाफोन-आयडियाच्या शेअर्समध्ये 5 दिवसांत 40 टक्क्यांनी वाढ

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- शिल्पा गुजर

गेल्या सहा ट्रेडिंग सत्रांमध्ये व्होडाफोन आयडियाचा शेअर जवळपास 40 टक्क्यांनी वाढला आहे. सरकार दूरसंचार क्षेत्रातील अडचणी समजून घेते आहे, सोबतच उपायांबाबतीत काही घोषणा केली जाईल, असे कंपनीचे अध्यक्ष हिमांशू कपानिया म्हणाले.

गेल्या काही काळापासून व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे शेअर घाट्यात होते, मात्र या शेअरमध्ये आता पुन्हा एकदा जबरदस्त वाढ बघायला मिळते आहे. जवळपास 14 टक्क्यांच्या वाढीसह व्होडाफोन आयडिया लिमिटेडचा शेअर 8.25 रुपयांवर बंद झाला. गेल्या सहा ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअरमध्ये जवळपास 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागच्या महिन्यात 30 ऑगस्टला त्याचा स्टॉक 5.95 रुपयांवर बंद झाला. त्यानंतर सहा ट्रेडिंग सत्रांमध्ये त्यात जवळपास 40 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा: पोस्ट देणार गृहकर्ज, LIC हाऊसिंग फायनान्ससोबत केला करार

सर्वोच्च न्यायालयाने एजीआरबाबत (AGR) दिलेल्या निर्णयामुळे कंपनी निराश असल्याचे शेअर बाजाराला सादर केलेल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. या आदेशाला पुढे आव्हान दिले जाईल असेही कंपनीने म्हटले. ही थकबाकी सुमारे 56 हजार कोटी होते. कंपनीने काही पेमेंट केले आहेत आणि तरीही ही थकबाकी 50 हजार कोटींच्या जवळपास आहे. मात्र सरकार दूरसंचार क्षेत्रातील अडचणी समजून घेते आहे आणि उपायांची घोषणा करण्याची अपेक्षा असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. उद्योग टिकण्यासाठी या अडचणींवर मार्ग शोधणे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा: 'दीदी'वर कब्जा मिळवण्याचा चीनचा प्लॅन, गुंतवणूक वाढवणार

दूरसंचार क्षेत्रात स्पर्धा जास्त

आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान बाजारात टिकाव लागला नसल्याचे कंपनीचे अध्यक्ष हिमांशू कपानिया यांनी शेअरधारकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. शिवाय, दुरसंचार क्षेत्रात स्पर्धेचं आव्हानही होते असे कापनिया म्हणाले.

हेही वाचा: iPhone 11 वर मिळतेय जबरदस्त ऑफर, अगदी कमी किंमतीत करा खरेदी

सरकारकडून सर्व प्रकारच्या मदतीची अपेक्षा

कुमार मंगलम बिर्ला यांनी ऑगस्टच्या सुरुवातीला राजीनामा दिल्यानंतर कपानिया यांची व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली. उद्योग सतत आर्थिक अडचणीत आहे आणि त्यामुळेच सरकार उद्योगांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत करेल, अशी आशा व्होडाफोन आयडिया लिमिटेडने व्यक्त केली.

हेही वाचा: हॉर्नच्या कर्कश आवाजापासून मिळेल आराम, सरकारचा नवीन नियम

कमी दरामुळे कंपन्यांच्या महसुलावर वाईट परिणाम

व्होडाफोन आयडिया लिमिटेड (VIL)देशात 25 वर्षांपासून मोबाईल सेवा देत आहे. त्यांच्या मोठ्या गुंतवणुकीवर चांगल्या परताव्यासाठी सरकारने त्यांना सहकार्य द्यावे, अशी कंपनीची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मधील जास्त स्पर्धा आणि किंमतींमुळे अत्यंत आव्हानात्मक स्थिती राहिल्याचे कपानिया यांनी सांगितले.

हेही वाचा: दररोज वाचवा 50 रुपये आणि व्हा कोट्यधीश, कसे ? जाणून घ्या...

दूरसंचार क्षेत्रात आव्हाने आहेत, पण डिजिटलचा वापर वाढल्याने नवीन संधी देखील भरपूर आहेत. कोरोना काळात डिजिटलची मागणी चांगलीच वाढली आहे. सरकार खासगी क्षेत्रातील ऑपरेटरमध्ये निरोगी स्पर्धा राखण्यासाठी पावले उचलेल, असा विश्वास कपानिया यांनी व्यक्त केला.

loading image
go to top