IRCTC
IRCTC

IRCTC शेअर्समध्ये घसरण, आता गुंतवणूक करावी का?

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीचे (IRCTC) शेअर्स ऑक्टोबर 2021 मध्ये 52 आठवड्यांच्या उच्चांकी 1279 रुपयांच्या पातळीवर गेल्यानंतर सतत घसरत आहेत.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीचे (IRCTC) शेअर्स ऑक्टोबर 2021 मध्ये 52 आठवड्यांच्या उच्चांकी 1279 रुपयांच्या पातळीवर गेल्यानंतर सतत घसरत आहेत. हा PSU स्टॉक रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून दबावाखाली आहे. सध्या, स्टॉक 644 रुपयांच्या आसपास दिसत आहे, जो त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा 50 टक्के खाली आहे.

आयआरसीटीसीचे शेअर्स 640-650 रुपयांच्या आसपास सपोर्ट बनवत असल्याचे आशिका ग्रुपचे तीर्थंकर दास म्हणाले. हा स्टॉक 2021 टॉप परफॉर्मर राहिला होता. आता ते 625 ते 690 रुपयांवर कंसोलिडेट होत आहे. तरीही हा शेअर आता या टप्प्यातून बाहेर पडून तेजी दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये आणखी कमजोरी येऊ शकते असे शेअर इंडियाचे रवी सिंग म्हणाले. त्याचा चार्ट पॅटर्न कमकुवत आहे. हा शेअर डाउनसाइडवर 655 रुपयांवर जाऊ शकतो. पण दुसरीकडे आयआरसीटी ही कर्जमुक्त कंपनी असल्याचेही त्यांनी सांगितले. इंटरनेट ट्रेन तिकीट बुकिंग व्यवसायात त्याची मक्तेदारी आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा हे स्टॉक्स बेस बिल्डिंग प्रक्रियेतून बाहेर पडताना दिसतात, तेव्हा लाँग टर्मच्या दृष्टीकोनातून त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

आयआरसीटीसीचा स्टॉक सध्या 200 DEMA च्या खाली दिसत असल्याचे प्रॉफिटेबल इक्विटीज लिमिटेडचे (Profitable Equities Limited) मनोज दालमिया म्हणाले. ही घसरण 550 ते 535 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com