IRCTC Stock मध्ये भूकंप! आणखी खाली येतील का शेअर्स ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IRCTC

IRCTC Stock मध्ये भूकंप! आणखी खाली येतील का शेअर्स ?

- शिल्पा गुजर

आयआरसीटीसीचा स्टॉक फक्त दोन दिवसांत 30 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. सलग दुसऱ्या दिवशी आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदार घाबरू लागले आहेत. बुधवारी स्टॉक 20 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. अशा स्थितीत आता गुंतवणूकदारांची रणनीती काय असावी तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.

गुंतवणूकदार सध्या विचार करत आहेत की आयआरसीटीसीचे स्टॉक ठेवायचे की काढायचे ? मंगळवार, 19 ऑक्टोबर रोजी IRCTC चे शेअर्स 15 टक्क्यांनी घसरले होते. मात्र, व्यवहार संपल्यावर बीएसईवर हा शेअर 8 टक्क्यांनी बंद झाला. परंतु बुधवारी सुमारे 20 टक्क्यांनी घट झाली.

उच्चांकावर होता शेअर

19 ऑक्टोबर रोजी, आयआरसीटीसीच्या शेअर्सने सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये 6393 रुपयांच्या आपल्या सर्वकालीन उच्चांक (all-time high) गाठला आणि 4370 रुपयांवर घसरला. दोन दिवसांत स्टॉक सुमारे 2000 रुपयांनी घसरला आहे. सध्या स्टॉक 4400 रुपयांवर आहे.

तज्ज्ञांची मते

इंटरनेट तिकीट विभागात आयआरसीटीसीची मजबूत मक्तेदारी आहे. कंपनीच्या 53 टक्के महसूल या विभागातून येतो. दुसऱ्या तिमाहीत आणि आगामी तिमाहीत अर्थव्यवस्था अनलॉक झाल्यामुळे आणि सणासुदीच्या हंगामात व्यवसाय आणखी वाढण्याची शक्यता आहे असेही मारवाडी शेअर्स अँड फायनान्स लिमिटेडचे उपाध्यक्ष (सल्लागार) अखिल राठी म्हणाले.

येत्या काळात फायदा !

कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाल्यामुळे येत्या काही दिवसात आणखी अनेक नवीन गाड्या चालवण्यात येतील. ज्यामुळे IRCTC ला फायदा होणार आहे असे राठी म्हणाले. कारण आयआरसीटीसीला कॅटरिंग व्यवसायातून एकूण उत्पन्नाच्या 27 टक्के उत्पन्न मिळते. मागच्या काळातील जोरदार तेजीमुळे येत्या आठवड्यात हा स्टॉक दबावाखाली राहण्याची शक्यता आहे. या शेअरमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही गुंतवणुकीची चांगली संधी असेल.

हेही वाचा: झोमॅटो वादाच्या भोवऱ्यात... पुन्हा मागितली माफी!

मागच्या काळात हा स्टॉक तेजीत होता, म्हणून लोक नफा बुकिंग करत आहेत, त्यामुळे स्टॉक घसरल्याचे शेअरइंडियाचे उपाध्यक्ष आणि रिसर्च प्रमुख डॉ. रवि सिंह म्हणाले. खाली 4,200 रुपये आणि 3,800 रुपयांवर IRCTC स्टॉकसाठी मजबूत सपोर्ट म्हणून काम करेल. तर वर रेझिस्टन्स 4,800 आणि 5,200 रुपये असू शकतात.

जीसीएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल म्हणाले की, आता आयआरसीटीसी आक्रमकपणे हॉस्पिटॅलिटी व्यवसायावर लक्ष केंद्रित करत आहे. हे हॉटेल, टूर आणि ट्रॅव्हल सेवा प्रोवायडर्स आणि स्थानिक अन्न पुरवठादार यांच्याशीही करार करत आहे. याशिवाय, आयआरसीटीसीने विमान कंपन्यांशीही करार केला आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे, बाजाराला समजले आहे की येणाऱ्या काळात आयआरसीटीसी भारतीय रेल्वेचे ई-तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म राहणार नाही. आयआरसीटीसी A to Z हॉस्पिटॅलिटी सेवा प्रोवायडर म्हणून उदयास येईल.

हेही वाचा: झोमॅटो वादाच्या भोवऱ्यात... पुन्हा मागितली माफी!

गेल्या एक महिन्यात IRCTC च्या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे. या घसरणीला न जुमानता, शेअरने गेल्या एका महिन्यात सुमारे 22 टक्के परतावा दिला आहे. आयआरसीटीसी स्टॉकने 6 महिन्यांत 175 टक्के परतावा दिला आहे. 6 महिन्यांपूर्वी हा शेअर 1640 रुपयांचा होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Share Market
loading image
go to top