सावधान! तुम्ही बनावट वेबसाईटवरून विमा खरेदी करत नाही ना? 

वृत्तसंस्था
Friday, 16 August 2019

विमा नियामकाचे ग्राहकांना आवाहन 

मुंबई: बनावट वेबसाईटवरून विमा खरेदी करणे टाळा, असे आवाहन विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) ग्राहकांना केले आहे. बनावट वेबसाईटवरील खरेदी टाळून ऑनलाईन फसवणूक टाळावी, याकरिता विमा नियामकाने नोटीस जारी केली आहे. www.irdaionline.org ही बनावट वेबसाईट असून यावरून कोणत्याही प्रकाराच्या विमा योजनांची विक्री केली जात नाही, असे "आयआरडीए"ने स्पष्ट केले आहे. 

सध्या इंटरनेटवर www.irdaionline.org ही बनावट वेबसाईट निदर्शनात आली असून त्यावरून विमा योजनांची विक्री केली जात आहे. मात्र अशा नावाची वेबसाईट अधिकृत नाही किंवा "आयआरडीए"ची मान्यताप्राप्त नाही. दरम्यान "आयआरडीए"ची अधिकृत वेबसाईट www.irdaonline.org. अशी आहे. दरम्यान बनावट वेबसाईट निर्माण करणाऱ्या कंपनी विरोधात कारवाई करण्यात येईल, असे "आयआरडीए"ने म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IRDAI Don't buy insurance from this fake website