
ITमध्ये सुवर्णसंधी! 'या' कंपन्यांमध्ये १ लाखांहून जास्त नोकऱ्या
जर तुम्ही फ्रेशर असाल, तर तुम्हाला सुवर्णसंधी आहे. चांगलं टॅलेंट हायर करण्यासाठी देशातील अग्रगण्य आयटी कंपन्यांमध्ये कायम स्पर्धा असते. येणाऱ्या वर्षभरात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज (एचसीएल) एकत्रितपणे या आर्थिक वर्षात 1 लाखांहून अधिक फ्रेशर्सना रोजगार देण्याची अपेक्षा आहे.
विप्रो (Wipro)
आयटी दिग्गज विप्रोचे सीईओ आणि एमडी, थियरी डेलापोर्टे यांनी कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 8,100 तरुण सहकाऱ्यांसह फ्रेशर्सला भरती केल्याचं सांगिलं. ही संख्या आधीपेक्षा दुप्पट करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
इन्फोसिस (Infosys)
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. कंपनीमध्ये वर्षभरात सुमारे 45,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. अॅट्रिशन रेट (कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर) मध्ये मोठी वाढ झालीय. बाजारातील सर्व क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आम्ही आमच्या महाविद्यालयीन पदवीधरांच्या नियुक्तीचा कार्यक्रम या वर्षी 45,000 पर्यंत वाढवू, असे वक्तव्य इन्फोसिसचे सीओओ (यूबी) प्रवीण राव यांनी केले आहे.
याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या कर्मचार्यांची गरज पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू ठेवणार आहोत. ज्यात आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याव्यतिरिक्त करिअर घडवण्याच्या संधींचा समावेश आहे, असे प्रवीन राव यांनी स्पष्ट केले.
टीसीएस (TCS)
चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात 35,000 नवीन पदवीधरांची नियुक्ती करण्याची योजना असल्याची माहिती टीसीएसने दिली आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) देशातील सर्वात मोठी आयटी फर्म आहे. कंपनीने गेल्या सहा महिन्यांत 43,000 पदवीधारकांना नव्याने नियुक्त केले आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचा ट्रिशन रेट वाढून 11.9% झाला. जो मागील तिमाहीत 8.6% होता.
एचसीएल टेक (HCL)
एचसीएल टेक्नॉलॉजीने गुरुवारी सांगितले की, कंपनी या वर्षी सुमारे 20,000-22,000 फ्रेशर्स पदवीधर घेण्याचा विचार करत आहे. पुढील वर्षी 30,000 फ्रेशर्स घेण्याची योजना असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
Web Title: It Companies From India Will Recruit Freshers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..