2 मिनिटांत ITR फॉर्म भरायचा की थर्टीफर्स्टनंतर दंड ते तुम्हीच ठरवा!

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

वर्षाला 2.5 लाख किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना ITR भरणे अनिवार्य आहे. वर्षाचे उत्पन्न 5 लाखांपर्यंत असेल आणि मुदतीपूर्वी तुम्ही ITR फाइल केले नाही तर या परिस्थितीत आयकर विभागाकडून 1000 रुपये दंड आकारला जाईल.

Income Tax Filing : इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची मुदत वर्षाअखेरपर्यंत आहे. 31 डिसेंबरपर्यंत जर ITR फाइल केला नाही तर तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. ज्या लोकांच्या उत्पनाचे ऑडीट होत नाही त्यांच्यासाठी आज आणि उद्या कोणत्याही परिस्थितीत आयटीआर फॉर्म भरणे अनिवार्य आहे. ज्यांची बॅलन्शशीट ऑडिट होते अशा व्यावसायिक आणि नोकरदारांना  31 जानेवारी 2021 पर्यंत ITR भरता येणार आहे. 

 वर्षाला 2.5 लाख किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना ITR भरणे अनिवार्य आहे. वर्षाचे उत्पन्न 5 लाखांपर्यंत असेल आणि मुदतीपूर्वी तुम्ही ITR फाइल केले नाही तर या परिस्थितीत आयकर विभागाकडून 1000 रुपये दंड आकारला जाईल. ज्यांचे वेतन 5 लाखांपेक्षा अधिक आहे त्यांना 10000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.  

जानेवारीत 14 दिवस राहणार बँका बंद; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या कधी आहेत सुटया

31 डिसेंबरपर्यंत जर ITR फाईल केला नाही तर दंडासह तुम्हाला मार्चअखेरपर्यंत म्हणजेच 31 मार्च 2021 पर्यंत ITR फाईल करता येईल. दंड भरण्यापेक्षा दिलेल्या मुदतीमध्ये फॉर्म फिलअपल करुन नुकसान टाळणे हे फायद्याचेच ठरेल.  

ऑनलाईन ITR फाईल करण्याची प्रक्रिया काय 
- सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इनकम टॅक्स विभागाच्या अधिकृत साईटला भेट द्यावी लागेल https://www.incometaxindiaefiling.gov.in/home  या वेबसाईटवर गेल्यानंतर  PAN नंबर (Permanent Account Number) च्या माध्यमातून तुम्ला लॉगीन करायचे आहे. जर पहिल्यांदाच ITR फाईल करत असाल तर New to e-filing पर्याय निवडून पहिल्यांदा नोंदणी करावी लागेल.  
- New to e-filing नंतर तुम्हाला युजर्स टाईपवर क्लिक करावे लागेल. याठिकाणी तुम्हाला पॅनसंदर्भातील माहिती भरावी लागेल. 
- त्यानंतर नोंदणी फॉर्म भरुन सर्व गोष्टी वेरिफाय करायव्या लागतील. 
- ITR फाईल करण्यासाठी तुम्हाला योग्य अर्ज सिलेक्ट करावा लागेल.  सॅलरी, पेंन्शन,  प्रॉपर्टी  उत्पन्न किंवा अन्य माध्यमातून मिळणारे उत्पन्न (लॉटरीशिवाय/बक्षीस स्वरुपाशिवाय)  फॉर्म  ITR-1 भरवा लागतो. भांडवलावर मिळणाऱ्या उत्पन्नासाठी ITR-2 सेलेक्ट करावे लागेल. एखाद्याचे नावे एका पेक्षा अधिक घरे असतील तर त्याला ITR-2A भरावा लागेल. (यातून लाभ मिळत नसेल तरच हा पर्याय निवडता येईल) व्यावसायिक आणि प्रोफेशनल वर्गातील लोकांना ITR-3, ITR-4, ITR-4S फॉर्म भरावा लागतो.  
- फॉर्म भरताना उत्पन्न आणि गुंतवणूक याची योग्य ती माहिती भरुन ITR फाईल करावा. जर उत्पन्न 50 लाखपेक्षा अधिक असेल तर कॉलम AL भरणे अनिवार्य आहे. यात मालमत्ता आणि देणी याचे विवरण द्यावे लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: itr filing guide how to file itr online penalty for filing late income tax return