जानेवारी 2020 मध्ये बॅंकांना 10 दिवस सुटी  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bank

जानेवारी 2020 मध्ये देशातील बॅंकांना 10 दिवस सुट्टी असणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने देशातील बॅंकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमावलीनुसार सर्व बॅंकांना नवीन वर्षारंभानिमित्त 1 जानेवारी 2020ला सुट्टी असणार आहे. त्याशिवाय दरमहिन्याच्या रविवारी आणि दुसऱ्या, चौथ्या शनिवारीदेखील सुट्टी असणार आहे.

जानेवारी 2020 मध्ये बॅंकांना 10 दिवस सुटी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - जानेवारी 2020 मध्ये देशातील बॅंकांना 10 दिवस सुट्टी असणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने देशातील बॅंकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमावलीनुसार सर्व बॅंकांना नवीन वर्षारंभानिमित्त 1 जानेवारी 2020ला सुट्टी असणार आहे. त्याशिवाय दरमहिन्याच्या रविवारी आणि दुसऱ्या, चौथ्या शनिवारीदेखील सुट्टी असणार आहे.

कर्जदारांना मोठा दिलासा, 'या' बँकेने केली व्याजदरात कपात

त्यामुळेच देशभरातील बॅंका जानेवारी महिन्यात विविध सण आणि इतर कारणास्तव बॅंकांना दहा दिवस सुट्टी असणार आहे. यातील काही सुट्ट्या या स्थानिक सण किंवा महत्त्वाच्या कारणांशी संबंधितसुद्धा आहेत. ही यादी पुढीलप्रमाणे,

1 जानेवारी - नवीन वर्षारंभ
2 जानेवारी - गुरुगोविंद सिंग जयंती
7 जानेवारी - इमोईनू इरात्पा (मणीपूर आणि ईशान्य भारतातील संपत्ती, समृद्धी आणि संसधानांच्या देवतेचा हा सण आहे.)
8 जानेवारी -  गान - गाई (ईशान्य भारतातील एक उत्सव)
14 जानेवारी - मकर संक्राती
15 जानेवारी - भोगी/ पोंगल / भोगली बिहू / तुसू पूजा / लोहरी / हादगा
16 जानेवारी - उझावर थिरूनल (तामिळनाडूतील शेतकऱ्यांचा सण)
23 जानेवारी - सुभाषचंद्र बोस यांची जयंती
30 जानेवारी -  सरस्वती पूजा / वसंत पंचमी

Google वर सर्वाधिक सर्च झाली 'ही' व्यक्ती

याव्यतिरिक्त विविध राज्यांमधील अनेक बॅंकांना त्या त्या राज्यांमधील स्थानिक सणांनिमित्तदेखील सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना जानेवारी महिन्यात या सुट्ट्यांची दखल घेऊनच आपले बॅंकिंग व्यवहार करावे लागणार आहेत.

FlashBack 2019: शेअर बाजार भविष्याचा वेध घेतोय पण तुम्ही?

loading image
go to top