esakal | जिओ-गुगलचा Jio Phone Next लॉन्च; जाणून घ्या खास फीचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

Jio Next Phone

जिओ-गुगलचा Jio Phone Next लॉन्च; जाणून घ्या खास फीचर्स

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : रिलायन्स जिओनं (Reliance Jio) गुगलसोबत (Google) पार्टनरशीपमध्ये तयार केलेला नवा स्मार्टफोन Jio Phone Next लॉन्च करण्यात आला आहे. अँड्रॉईड बेस्ड (Android Based) या स्मार्टफोनची खास ऑपरेटिंग सिस्टिम जिओ आणि गुगलने मिळून तयार केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण (Reliance AGM) सभेत कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची याची घोषणा केली. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा हा फोन असून तो १० सप्टेंबरपासून बाजारात दाखल होणार आहे. (Jio Google Jio Phone Next launch Learn special Features)

जिओच्या या खास स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, सर्वसामान्यांना परवडेल अशी या फोनची किंमत असेल असं मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. जिओ-गुगलचा हा फोन गेमचेंजर ठरेल असं सांगितलं जात आहे. कारण, भारताला 2G मुक्त करुन 5 G युक्त करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं अंबानी यांनी या बैठकीदरम्यान सांगितलं. गेल्यावर्षी लॉकडाउनच्या काळात गुगल आणि जिओमध्ये सहकार्य करार झाला होता. ज्याची बरीच चर्चाही झाली होती.

काय आहेत जिओच्या या नव्या फोनची वैशिष्ट्ये -

  1. Jio Phone Next हा नवा स्मार्टफोनमध्ये जिओ, गुगलचे फीचर्स आणि अॅप्स असतील.

  2. या फोनमध्ये अॅन्ड्रॉईड बेस्ड विशेष ऑपरेटिंग सिस्टिम असणार आहे.

  3. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी या स्मार्टफोनची किंमत असणार आहे.

  4. येत्या १० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला जिओ-गुगलचा हा स्मार्टफोन बाजारात दाखल होईल.

  5. या स्मार्टफोनच्या बॅकपॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

  6. काळ्या रंगात हा फोन उपलब्ध असणार आहे.

  7. या स्मार्टफोनमध्ये 5G सुविधा असणार असून यासाठी जिओ गुगलच्या क्लाउडचा वापर करणार आहे.

loading image
go to top